आशाताई बच्छाव
आ शंकरराव गडाखांच्या संपर्क कार्यालयातुन जनसमान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार.
ह भ प.
पंढरीनाथ महाराज तांदळे
आ शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयाचे सोनईत उदघाटन.
सोनई प्रतिनिधी/कारभारी गव्हाणे
आ शंकरराव गडाख जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक तब्बल 30 वर्षांपासून एका चहाच्या टपरीवर बसून प्रश्नांची सोडवणूक करतात मंत्री झाल्यानंतरही यात त्यांनी बदल केला नाही परंतु विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सोनईत सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन
ह भ प पंढरीनाथ महाराज तांदळे,ह भ प कारभारी महाराज झरेकर,ह भ प भगवान महाराज जंगले(शास्त्री)
यांच्या हस्ते संपन्न झाले
याप्रसंगी आ शंकरराव गडाख,ठाकरे गट शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,ह भ प नामदेव महाराज कोरडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना ह भ प पंढरीनाथ महाराज तांदळे म्हणाले की गेले अनेक वर्षांपासून आ गडाख जनतेच्या प्रश्नासाठी लढत असतात.सत्ता पद असो वा नसो त्यांचा संघर्ष सदैव सुरू आहे.
कष्टकरी,शेतकरी,सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून ते काम करतात.
वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेले सुसज्ज संपर्क कार्यालय जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे केंद्र होणार असून आ गडाख यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होणार आहे.
याप्रसंगी ह भ प कारभारी महाराज झरेकर,ह भ प भगवान महाराज जंगले( शास्त्री) आदींनी शुभेच्छा दिल्या व संपर्क कार्यालय जनसेवेचे केंद्र होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आ गडाख यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील गावा गावातून तरुण,जेष्ठ कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांच्या सत्कारास उत्तर देतांना आमदार शंकरराव गडाख म्हणाले संत ,महतांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्ताने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे आपण दिलेल्या शुभेच्छांची ऊर्जा घेऊन नेवासा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
सोनई च्या संपर्क कार्यालयात प्रश्न घेऊन जनतेने भेटावे मी त्याठिकाणी उपलब्ध राहील.
ऑफिस जरी सुसज्ज बांधले असले तरी सर्वसामान्य जनतेशी असलेला सहज संवाद ठेवून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आ गडाख म्हणाले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
फोटोओळी…
सोनई ता नेवासा येथील आ शंकरराव गडाखांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतांना मान्यवर.
चौकट..
30 वर्षांपासून ज्या लाकडी बाकडावर आ शंकरराव गडाख सोनई येथे बसतात त्याच बाकडांवर जुन्या सहकाऱ्यासह बसून शुभेच्छा स्वीकारल्या व वाढदिवसाच्या दिवशीही जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली.
आ गडाख यांच्या या कृतीने उपस्थित सर्वांचे मने जिंकले.