Home नाशिक मालेगांव तालुक्यातील सोयगाव / दाभाडी परिसरातील हरिकेश लाँन्स येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय...

मालेगांव तालुक्यातील सोयगाव / दाभाडी परिसरातील हरिकेश लाँन्स येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न 

156
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230529-182209_WhatsApp.jpg

मालेगांव तालुक्यातील सोयगाव / दाभाडी परिसरातील हरिकेश लाँन्स येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न
_सुभाष कचवे:-विषेश प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क चँनल मालेगांव महाराष्ट्र,_
_सविस्तर बातमी अशी की काल दिनांक 28/मे/2023 वार रविवारी सकाळी ठिक 9:30 वाजता मालेगांव तालुक्यातील सोयगाव / दाभाडी रोडवरील हरिकेश लाँन्स मध्ये जलतरणपटूं साठी नव्यानेच बांधण्यात आलेला अलिशान असा जलतरण तलावात मालेगांव तालुक्यातील स्विमिंग असोशियन आणि खैरनार्स स्पोर्टस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जवळपास 4 वर्ष वयोगटा पासुन ते पुढील कोणत्याही वयोगटातील मुले/मुली तसेच पुरुष व महिलां करीता…_
1) फ्री स्टाईल (FREE STYLE)
2) ब्रेस्ट स्ट्रोक (BREAST STROK)
3) बँक स्ट्रोक (BACK STROK)
4) बटर फ्लाय (BUTTR FLY)
_या सारख्या विविध जलतरण स्पर्धेत 15 मिटर,25 मिटर,50 मिटर आणि 100 मिटर पर्यंत पोहण्यासाठी अंतर क्षमता ठेवली असता कार्यक्रमाचे आयोजक,प्रेक्षक आणि सर्वच स्पर्धकांमध्ये प्रचंड असा उत्साह दिसून येत होता…_
_या स्पर्धेसाठी आयोजित केलेली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा यशस्वी करणेसाठी पंच म्हणून मा.प्रा.नितीन खैरनार सर (एन आय एस कोच) लाईफ गार्ड ट्रेनर तसेच मा.गौरव जगताप,चंद्रशेखर जाधव,आदित्य खर्जे आणि अभिजित निकम यांनी विषेश परिश्रम घेऊन अत्यंत शिस्तबद्ध व उत्कृष्ट पणे नियोजन केले…_
_या जिल्हास्तरीय जलतरणपटू स्पर्धेच्या कार्यक्रम उदघाटन प्रसंगी हरिकेश लाँन्सचे मालक तथा केशर जलतरण तलावाचे मुख्य संचालक चि.चेतन दादा मोरे व बापुसाहेब मोरे यांचेसह मा.नारायण पवार साहेब,तुषार देसले साहेब,पवन भामरे साहेब,समीर सोनवणे साहेब,अमित विसपुते साहेब,प्रितम बत्तीसे साहेब,दिनेश अहिरे साहेब व मालेगांव तालुक्यातील स्विमींग असोशियन आणि खैरणार्स स्पोर्ट क्लबचे बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते…_
_कार्यक्रमाच्या शेवटी समारोप प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना मा.बापुसाहेब मोरे यांनी हरिकेश लाँन्सच्या रुपात एक प्रकारे जनसेवेच्या व्रता बरोबरच खरोखर यापुढील काळात तरी नदीनाले,तलाव,डबके आणि विहिरी सारख्या साठवण पाण्यात पडल्यास दुर्दैवाने तसा वाईट प्रसंग घडु नये म्हणून आतातरी बालपणापासूनच पाण्यात पोहणे शिकने ही नक्कीच काळाची भयंकर मोठी गरज असल्याचा दुरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून हरिकेश लाँन्सचे मालक तथा केशर जलतरण तलावाचे मुख्य संचालक चि.चेतन दादासाहेब मोरे व बापुसाहेब मोरे यांनी परिसरातील लहान लहान मुले/मुली तसेच पुरुष आणि महिलांना सुद्धा पाण्यात पोहने शिकण्यासाठी अलीशान असा जलतरण तलाव बांधून सर्वांसाठीच एक प्रकारे जिवणदायी उपक्रम चालू केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातुन कौतुकास्पद वर्षाव केला व यापुढील अत्यंत महत्त्वाकांशी उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या…_
कार्यक्रमाच्या शेवटी हरिकेश लाँन्स तथा केशर जलतरणपटू तलावाचे मुख्य संचालक चि.चेतन दादासाहेब मोरे यांनी उपस्थित सर्वच मान्यवर,संयोजक,आयोजक आणि जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धकांचे अगदी मनापासून आभार मानुन काल दिनांक 28/रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरणपटू स्पर्धेचा कार्यक्रम हा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व प्रचंड अशा उत्साहात संपन्न झाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here