Home Breaking News व-हाणे प्रकरणात अखेर चौकशी समिती स्थापन…न्यायासाठीचा लढा अखेरपर्यत सुरुच राहणार!     ...

व-हाणे प्रकरणात अखेर चौकशी समिती स्थापन…न्यायासाठीचा लढा अखेरपर्यत सुरुच राहणार!               

143
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230413-WA0036.jpg

व-हाणे प्रकरणात अखेर चौकशी समिती स्थापन…न्यायासाठीचा लढा अखेरपर्यत सुरुच राहणार!                                                मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार भवन जागेच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या संघर्षात्मक लढयाला आता कुठे यश मिळण्यास सुरुवात झालेली असून, युवा मराठा महासंघाने मालेगांव पंचायत समितीसमोर विविध आंदोलने केलीत.व पत्रकार भवन जागेचा मुद्दा हा कायम लावून धरलेला असतानाच,व-हाणे ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व सावळा गोंधळाची सखोल चौकशी करण्याची मागणीही युवा मराठा महासंघाने केलेली होती.त्यानुसार व-हाणे ग्रामपंचायतीची सन १९९९ ते २०२३ अखेर सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केल्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मितल यांनी महासंघाला दिले आहे.येत्या पंधरा दिवसात चौकशी समिती व-हाणे ग्रामपंचायतीच्या वरील कालावधीतील प्रोसिडींग बुकातील नागरिकांच्या सहयाची पडताळणी करुन ग्रामपंचायतीकडून झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याबरोबरच ग्रामपंचायतीने शासकीय वास्तू निर्लिखित न करता त्या पाडून तेथे अतिक्रमण वाढविलेले असल्याने आणि त्याशिवाय इतरही मुद्द्यावर चौकशी करुन समिती आपला अहवाल सादर करेल.व-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांची यापूर्वीच विभागीय चौकशी लागलेली आहे.तर पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंच सौ.अनिता पवार यांच्या अपात्रेते विषयी सोमवार दि.१७ रोजी याचिका दाखल केली जाणार आहे. चौकट…..दरम्यान व-हाणे प्रकरणात चौकशी समितीने निप्षक्षपातीपणाने व न्यायी बुध्दीने काम न केल्यास नाशिक जिल्हा परिषदेसमोर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.गेल्या तीन वर्षात पत्रकार भवन जागेच्या मुद्द्यावरुन महासंघाने हा अत्यंत जिव्हाळ्याचा व निकडीचा प्रश्न लावून धरलेला आहे.व तसा पाठपुरावा सुरु आहे.सदर पत्रकार भवनची जागा आज रोजी ताब्यात व वापरात असताना, चौकशी समितीने योग्य दिशेने वस्तुनिष्ठ चौकशी करावी.कारण या प्रकरणाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असून,चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.त्यासाठी प्रसंगी चुकीचे कामे करणाऱ्यां विरोधात न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचे राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.

Previous articleव-हाणे सरपंच अपात्रतेसाठी सोमवारी याचिका दाखल होणार 
Next articleमेशीत जेनेरिकाँर्ट सेवा मेडिकलचे गणेशानंदपुरीजी महाराजांच्या हस्ते उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here