Home Breaking News व-हाणे सरपंच अपात्रतेसाठी सोमवारी याचिका दाखल होणार 

व-हाणे सरपंच अपात्रतेसाठी सोमवारी याचिका दाखल होणार 

166
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230408-WA0041.jpg

व-हाणे सरपंच अपात्रतेसाठी सोमवारी याचिका दाखल होणार                                          मालेगांव ,(विजय चांदणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- व-हाणे, ता.मालेगांव येथील सरपंच सौ.अनिता भरत पवार यांचे सरपंचपद अपात्र करण्यासाठी सोमवार (दि.१७ एप्रिल) रोजी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,सरपंच सौ.अनिता भरत पवार यांनी पदाचा गैरवापर करीत ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे या व-हाणे गावात वास्तव्यास नसताना सुध्दा शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे व बनावट कागदपत्र बनवून शासनाकडून लाखो रुपये घरभाडे भता लाटला आहे.बनावट व खोटे कागदपत्र बनवून ग्रामसेविका सांळुखे या व-हाणे गावात ज्या व्यक्तीच्या घरात राहत असल्याचे दाखविण्यात आले,प्रत्यक्ष त्या व्यक्तीनेच स्वतः नोटरी प्रतिज्ञापत्र मालेगांवचे गटविकास अधिकारी भरत शामराव वेंदे यांच्याकडे सादर करून,प्रतिज्ञापत्रात स्पष्ट म्हटले आहे की,ग्रामसेविका सांळुखे या कधीच माझ्या घरात वास्तव्यास नव्हत्या व आजही नाहीत.त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकाने पदाचा गैरवापर केलेला असल्याने त्यांचेवर कारवाईची मागणी नोटरी प्रतिज्ञापत्रातून करण्यात आलेली आहे.दरम्यान याच प्रश्नवर दिनांक १० एप्रिल पासून युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी मालेगांव पंचायत समिती समोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केलेले असून,आज उपोषणाचा चौथा दिवस,असल्याने उपोषणार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून,सरपंच सौ.पवार यांना अपात्र करण्याबरोबरच ग्रामसेविकेस तडकाफडकी निलंबित करण्याची मुळ मागणी असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Previous articleमाजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन।
Next articleव-हाणे प्रकरणात अखेर चौकशी समिती स्थापन…न्यायासाठीचा लढा अखेरपर्यत सुरुच राहणार!               
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here