आशाताई बच्छाव
होरायझन अकॅडमी सीबीएसई नाशिक या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
“स्वातंत्र्य ही आकांक्षा मानवी आत्म्याच्या सर्वात उदात्त आणि गहन आकांक्षांपैकी एक आहे”.- प्राचार्या सौ.श्रुती देशमुख
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित होरायझन अकॅडमी (सीबीएसई) नाशिक या शाळेत 26जानेवारी रोजी 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्या सौ.श्रुती देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता 1 ली च्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला. प्राचार्या सौ.श्रुती देशमुख यांनी आपला देश किती समृद्ध आहे याची आठवण करून दिली आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या वीरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या भाषणाने प्रेरित करताना “स्वातंत्र्य ही मानवी आत्म्याच्या सर्वात उदात्त आणि गहन आकांक्षांपैकी एक आहे”. असे प्रेरणादायी विचार प्राचार्या सौ.श्रुती देशमुख यांनी मांडले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व परितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी जगदीश शिंदे सर व लक्ष्मीकांत कोकाटे सर या पाहुण्यांनी आपले विचार मांडले. तसेच स्कूलच्या को- ऑर्डीननेटर पाठक मॅडम आणि मयुरी मॅडम यांनी ही मनोगत व्यक्त केले. तसेच छायाचित्र वृत्तांकनासाठी कलाशिक्षक श्री. प्रवीण सर यांचे सहकार्य लाभले.
यानंतर विविध स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पारितोषिक आणि पदक वितरित करून गौरवण्यात आले.
यावेळी स्थानिक समितीचे सदस्य श्री दीपक चव्हाण सर, श्री जगदीश शिंदे सर, श्री रमेश कडलग सर, श्री शंकरराव कसबे सर, श्री प्रमोद करवल सर, श्री संदीप थेटे सर, श्री लक्ष्मीकांत कोकाटे सर, युवा मराठा न्युज पेपर अँड नेटवर्क चे विभागीय संपादक मा.श्री. भास्कर देवरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
पारितोषिक वितरण खालील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
2021-2022 स्कॉलरशिप परीक्षेत यश प्राप्त विद्यार्थी
सोहम संजय काळोगे,सार्थक सोपान वाटपाडे, समर्थ मिलिंद मुळाने, ओम प्रकाश लहामगे, प्रणव विक्रम भुजबळ, स्वराज जयंत देवरे, सक्षम संजय पाटील, धन्वंतरी वाल्मीक आहेर, आयुष जयंत पालवी, हेरंब योगेश झोपे, मृण्मयी विजय गायकवाड, अनुष्का अतुल बेंडाळे
एसओएफ आंतरराष्ट्रीय सामान्यज्ञान ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी* – आदिती हेमंत पाटील, आर्यन अजयकुमार खंडेलवाल,अभिर मनोज जाधव, सुरेश धुरंदर शिंदे, सुमित देवेंद्र पवार, आराध्या लक्ष्मीकांत कोकाटे, पार्थ विनोद महाले, परिस भारत पाटील
विविध खेळांत प्राविण्य मिळविलेले विध्यार्थी
जिम्नॅस्टिक- आश्लेषा सबनीस, राहुल चव्हाण
आर्चरी – समीक्षा ठोंबरे, प्रतीक्षा ठोंबरे, वरद पाटील, प्रथमेश थेटे, वैष्णवी कदम,
शूटिंग- आदिती जाधव, शौर्य जाधव,
फेन्सिंग- अर्चित कोरडे, मैथिली डोंगरे, वेदांत देवरे,
कराटे- अर्पण सोनवणे,
स्विमिंग- हिमांशू तांबोळी
छायाचित्रण आणि वृत्तांकन – श्री भास्कर देवरे (विभागीय संपादक, युवा मराठा न्युज पेपर अँड नेटवर्क)