Home बुलढाणा संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर असलेले झाडे झुडपे त्वरीत हटवा!

संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर असलेले झाडे झुडपे त्वरीत हटवा!

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20221222-WA0001.jpg

संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर असलेले झाडे झुडपे त्वरीत हटवा!

शिवसेना किसान सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला संग्रामपूर तहसीलदार मार्फत निवेदन.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

तालुक्यातील संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे झालेली आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा वळण रस्त्यावर या काटेरी झुडपांमुळे अपघात होत आहेत त्यामुळे संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर असलेले काटेरी झुडपे त्वरित हटवा या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेच्या वतीने 21 डिसेंबर रोजी तहसीलदार मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की संग्रामपूर ते बोडखा हा अंदाजे तीन ते चार किलोमीटर चा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत तसेच रस्त्यावरील वळणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेले आहेत त्यामुळे या वाढलेल्या झाडे झुडपांमुळे दुचाकी व चारचाकी वाहने तसेच वाहनावरील चालकांना समोरून कुठले वाहन येत आहे हे दिसत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतो तसेच बऱ्याच वेळा या वळणावर रस्त्यावर झाडे झुडपे वाढल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही तसेच वाहनधारकांना रात्रीच्या वेळी देखील सुद्धा या काटेरी झाडाझुडपांचा आपले वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यामुळे रस्त्यावर असलेले झाडेझुडपे त्वरित काढण्यात यावी अन्यथा आणि शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे उप तालुका प्रमुख, सुनील मुकुंद ,राहुल मेटांगे, धनंजय आवचार, विशाल बकाल, रामदास जंबे, शेख अब्दुल शेख लुकमान, मुरली इंगळे, योगेश वेरूळकर, प्रल्हाद अस्वार, अमोल बाळासाहेब देशमुख, अतुल बांगर, विशाल बांगर, विलास दंडे, प्रकाश थोरात आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत .

Previous articleदिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.
Next articleविशेष वृत्त मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या नागोजी नाईक यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here