Home पुणे अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही?

अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही?

158

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0058.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे      अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही? शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने शिवसंग्राम संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी चौकशी करावी असे सांगितले. मुंबईमध्ये कोणत्या बैठकीला अचानक त्यांना बोलावले गेले याचीही चौकशी व्हावी असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या निधनाने संघटनेच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे . अहोरात्र मराठा समाजासाठी झटणारा नेता गेला असे सर्व राजकीय स्तरातून व्यक्त केले जात आहे.अपघात ५:०५ मिनिटांनी घडला परंतु एक तास त्यांना कुठलीही सुविधा मिळाली नाही. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर घडला याची सखोल चौकशी करावी असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत .यासाठी ८ पोलीस पथकाची निवड करण्यात आली आहे. सर्व मराठा समाजाकडून ,याची निपक्षपणे चौकशी करा अशी मागणी होत आहे अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही अशी त्यांनी सांगितले.

Previous articleइजिप्तच्या गिजा शहरात चर्चला भीषण आग
Next articleशिवसंग्रामचे संस्थापक मराठ्यांची बुलंद तोफ विनायक मेटे काळाच्या पडद्याआड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.