Home बुलढाणा शिवसंग्रामचे संस्थापक मराठ्यांची बुलंद तोफ विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

शिवसंग्रामचे संस्थापक मराठ्यांची बुलंद तोफ विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0058.jpg

शिवसंग्रामचे संस्थापक मराठ्यांची बुलंद तोफ
विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार

मा. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे(केज-बीड) यांचा दि.13/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर रसायनी पोलीस ठाणे हद्दीत फोर्ड गाडीमध्ये क्र MH.DP 6364 प्राणांतिक अपघात घडलेला आहे मेटे यांची गाडी मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धक्का मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा करिता दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी त्यांची तपासणी करीत असताना त्यांना मृत घोषित केले. मेटे यांचे बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय. आर. बी.या रुग्णवाहिकेने तात्काळ एम. जी. एम. हॉस्पिटल,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आय.आर.बी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी पी.एस.आय. चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन एपीआय बालवडकर व स्टाफ तसेच आय. आर. बी.चे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते.सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला मिळाली होती
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ झालेल्या या अपघाताला सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटें यांच्या वाहनचालक एकनाथ कदम यांनी केला.त्यांनी सांगितले की जेव्हा ते रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर झोपले तरी पण मात्र कोणत्याच गाड्या तिथे थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. त्यावेळी त्यांना एका छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.
विनायक मेटे दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. मेटेंच्या कार चालकाने थर्ड लेनमधून मध्यल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ट्रकचालकही लेन बदलत होता. मेटेंची गाडी वेगाने असल्याचा संशय असून चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. यामुळे गाडी डाव्याबाजुने ट्रकवर आदळली. एअरबॅग उघडली, मेटे मागे झोपले होते. अचानक पुढे आदळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर दहा टायरचा ट्रक थांबला नाही, चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे. या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.

विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाचे झालेले नुकसान आम्ही शब्दात सांगू शकत नाही मात्र हा अपघात झाला की घातपात झाला अशी शंका उपस्थित होत आहे त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी
अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली

Previous articleअन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही?
Next articleअवैद्य धंदे बंद करण्याबाबत सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here