Home सोलापूर लक्ष्मी टाकळी चे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.

लक्ष्मी टाकळी चे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20221122-WA0028.jpg

लक्ष्मी टाकळी चे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर शहर जवळ असलेल्या तीन ते साडे किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्मी टाकळी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते याचबरोबर शहरापासून अवघ्या जवळच असल्याने त्यांचे विस्तारीकरण होऊन झपाट्याने उपनगर मध्ये वाढ होऊ लागले असल्याने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरत असल्याने या ग्रामपंचायतीने नगरपंचायत मध्ये रुपांतर करावे अशा आशयाचा ठराव लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी करून गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना लेखी निवेदनाद्वारे काही दिवसापूर्वी जिल्हा असून याबाबतचे सविस्तर पत्र निवेदन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून मुख्यमंत्र्यांनी या पत्राची निवड निवेदनाची दखल घेऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ची स्थापना ही एक मे 1965 ला झाले असून आताही ग्रामपंचायत जवळजवळ 40 ते 42 वर्षाची होत असून या लक्ष्मी टाकळी गावाचा विस्तार वाढू लागला आहे याकरताही ग्रामपंचायत नगरपंचायत होणे गरजेचे आहे 2011 चे जनगणनेनुसार लक्ष्मी टाकळीची लोकसंख्या 10122 असून सध्या या लक्ष्मी टाकळी व परिसर मिळून सुमारे 20 ते 25 हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे तसेच वरचेवर गावठाण भाग सोडून प्लॉट एरिया मध्ये नागरी वसाहती वाढत आहेत त्यामुळे या सर्वांना सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतला आर्थिक सह इतर बाबींची कसरत करावी लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून महेश साठे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी ठराव करून लक्ष्मी टाकळीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करावी अशी मागणी केली आहे हीच मागणी लेखी पत्रद्वारे दोन वर्षांपूर्वी महेश साठे यांनी मुख्यमंत्री यांना भेटून केली आहे या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ दखल घेण्यास सुचित केले आहे त्यामुळे आता लवकरच पंढरपूर शहराजवळ असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार आहे सध्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत भाजपा व शिंदे सेना अर्थात परिचारक गटाची असून राज्यात भाजपा व शिंदे यांचे सरकार असल्याने ही ग्रामपंचायत नगरपंचायत होण्यास वेळ लागणार नाही हे झाल्यानंतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची तेवढीच जबाबदारी या सदस्यावर राहणार आहे मुख्यमंत्री आणि साठे यांनी दिलेल्या निवेदनाचे दखल घेतल्याने लक्ष्मी टाकळी वासियांच्या व उपनगरातील लोकांच्या आशा पल्लवीत झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here