Home नाशिक मेशी येथील विद्यालयाला कुलप ठोकण्याचा इशारा

मेशी येथील विद्यालयाला कुलप ठोकण्याचा इशारा

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0020.jpg

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:– मेशी ता.देवळा येथील जनता विद्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा.
येथील नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीची शाळा असून इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची ९६५ (नऊशे पासष्ट) विद्यार्थी शिक्षण घेतात .त्यातच दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र देखील आहे. परंतु शाळेच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभाराचे वाभाडे आज पालकांनी काढले अपुरा व अनियमित शिक्षक वर्ग ,दर्जाहीन शिक्षण, निकृष्ट प्रतीचा पोषण आहार तसेच गैरहजर असलेले शिक्षक दुसऱ्या दिवशी हजेरी पुस्तकावर सह्या करण्याचा महापराक्रमी प्रताप,पोषण आहारावेळी विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागते हे सगळे आज पालकांनी चांगल्या प्रकारे अनुभवले असून यावेळी शाळेचे प्राचार्य आणि पालक यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली.संतप्त पालकांनी कुठल्याही क्षणी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी दिला आहे.शाळेत एकूण २१ शिक्षकांची पदे मंजूर असतांना त्यात तीन पदे रिक्त आहेत व अठरा शिक्षकांपैकी अकरा शिक्षक हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बिनपगारी असल्याने काही शिक्षक वेळेवर हजर राहत नसल्याचे देखील यावेळी पालकांच्या निदर्शनास आले.
यावेळी मेशी विकास सोसायटीचे उपसभापती धना शिरसाठ, सतिश बोरसे,समाधान शिरसाठ,गोरख सोनवणे, संतोष शिरसाठ, किशोर शिरसाठ, आप्पा बोरसे,दिलीप शिरसाठ, शरद पगार,रविंद्र चव्हाण, राजेंद्र बोरसे यांसह पालक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here