Home गडचिरोली शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत प्रशासनाला निवेदन..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार...

शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत प्रशासनाला निवेदन..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात तहसीलदार मार्फत निवेदन सादर..!!

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0017.jpg

शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत प्रशासनाला निवेदन..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात तहसीलदार मार्फत निवेदन सादर..!!                                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी :-अहेरी तालुक्यातील तलाठी साजा क्र.2 मधील शेतकऱ्यांनी आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरीचे तहसीलदार मा.श्री.ओंकार ओतारी साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब,मा.जिल्हाधिकारी साहेब,मा.उपविभागीय अधिकारी साहेब,यांना निवेदन पाठवण्यात आले..!!

सदर निवेदनात म्हंटले आहे.कि [१]सन २०१६-१७ पासूनचे नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन(सन्मान) मिळण्यात यावी.[२]सन २०२०-२१ एकरी दहा हजार रू.प्रमाणे मंजूरी मिळणे.[३] सन २०२२-२३ वर्षाचे धान खरेदी करण्याबाबत.[४] धानाला प्रति किंवटल तीन हजार पाचशे रुपये हमी भाव मिळणे.[५] धान खरेदीस पुरेसा बारदाणा उपलब्ध करून देने. [६] सन २०१८-१९ ते अद्यायावत बारदाणाचे रक्कम मिळणे.[७] वन अतिक्रमण शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे.[८] सन २०२१-२२ वर्षाचे धान खरेदीचे बोनस मिळणे.[९] एकरी २० किंवटल धान खरेदी करणे.आदि समस्या बाबत आज तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे..!!

निवेदन देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या सहित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,वेलगुरचे सरपंच श्री.किशोर आत्राम,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,पाटील मेश्राम,बाबूराव कस्तूरे,काशींराम गदेकर,हीरामन राऊत,महादेव शेंडे,दिलीप दुर्गे,शामराव चौधरी,आनंदराव कन्नाके,कैलाश दुर्गे,अशोक निकूरे,प्रभाकर वासाके,गनू शेंडे,व शेतकरी उपस्थित होते..!!

Previous articleठाकरे सरकारचे भवितव्य धोक्यात….मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार..?; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत
Next articleमेशी येथील विद्यालयाला कुलप ठोकण्याचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here