Home माझं गाव माझं गा-हाणं मुलगी बघायला गेले,अन लग्न लावून आले! सटाणा,(जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क)...

मुलगी बघायला गेले,अन लग्न लावून आले! सटाणा,(जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क) अवघ्या ०५-०६ तासात विवाह संपन्न दिनांक ३१/०१/२०२१ रोजी महाराष्ट्र वाणी युवामंच सटाणा शहराचे मा.अध्यक्ष मा.श्री.मनोज भिका पिंगळे यांचे लहान बंधु चि.अमोल श्री.भिका रुंझु पिंगळे,सटाणा यांचे चिरंजीव व चि.सौ.का.किर्ती श्री.प्रकाश जगन्नाथ कोठावदे,सटाणा यांची कन्या यांचा लाडशाखीय वाणी

196

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

मुलगी बघायला गेले,अन लग्न लावून आले! सटाणा,(जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क)
अवघ्या ०५-०६ तासात विवाह संपन्न
दिनांक ३१/०१/२०२१ रोजी
महाराष्ट्र वाणी युवामंच सटाणा शहराचे मा.अध्यक्ष मा.श्री.मनोज भिका पिंगळे
यांचे लहान बंधु चि.अमोल
श्री.भिका रुंझु पिंगळे,सटाणा यांचे चिरंजीव व चि.सौ.का.किर्ती श्री.प्रकाश जगन्नाथ कोठावदे,सटाणा यांची कन्या यांचा लाडशाखीय वाणी समाजात एक आदर्श विवाह पार पाडला.
सकाळी ११.०० वाजता मुला कडील मंडळी मुलगी बघण्यासाठी गेले. मुलगा-मुलगी दोघाची ही एकमेकांना पसंती झाली व अवघ्या काही तासातच विवाह संपन्न झाला.
अचानक विवाह ठरल्यामुळे दोन्ही कडची मंडळीची चांगली धावपळ झाली. वेळेवर लाँन्स,आचारी,गुरव,ब्राह्मण,बँन्ड,घोडा,मुला-मुलींचा बस्ता,सोन-नाण,फुलहार हे सर्व काही ५-६ तासात च ठरवले व विवाह संपन्न झाला ह्या विवाहाची खरंच सर्वत्र चर्चा होत व एक प्रेरणादायी विवाह झाला.
ह्या विवाहासाठी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या आदर्श विवाहासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक मा.श्री.श्रीधर रामचंद्र कोठावदे,प्रगती शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक मा.श्री.संदिप भालचंद्र कोठावदे,मा.श्री.पोपटराव दिनकर अमृतकार,मा.श्री.दिपक बाळकृष्ण वाणी मोलाचे सहकार्य होते.
यांचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घ्यावा.
नवदाम्पत्यास यानिमिताने शुभेच्छा
लाडशाखीय वाणी समाज मंडळ,सटाणा
महाराष्ट्र वाणी युवा मंच,सटाणा (बागलाण)
महाराष्ट्र वाणी महिला मंच, सटाणा
लाडशाखीय वाणी महिला मंडळ, सटाणा आदीकडून बहाल करण्यात आल्या.

Previous articleमौलाना आझाद सेवाभावी संस्था गौरव पुरस्कार सन्मानित.
Next article🛑 खेड तालुक्यातील पंधरागाव धामणंद येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.