Home नांदेड जुन्ना येथील तलावात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

जुन्ना येथील तलावात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

72
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0009.jpg

जुन्ना येथील तलावात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

मुखेड शहरातील फुलेनगर भागातील रहिवाशी चंद्रकांत माधव चोपवाड वय 13 वर्ष या मुलाने मुखेड पासुन जवळच असलेल्या जुन्ना येथील तलावात पोहण्यासाठी गेला असता पोहण्यायादरम्यान त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि . 11 जुन रोजी दुपारी 02 वाजताच्या सुमारास घडली . सविस्तर वृत्त असे की मुखेड शहरातील फुलेनगर भागातील रहिवाशी माधव चोपवाड यांचा सर्वात लहान मुलगा चंद्रकांत हा आपल्या मित्रासह जुन्ना येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता तेव्हां तलावात पोहत असताना चंद्रकांत या चिमुकल्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो मध्येच बुडाला हे जेंव्हा त्याच्यासोबत असलेल्यांना कळाले तेंव्हा त्यांनी चंद्रकांत चा तलावात शोध घेतला पण तो सापडत नसल्याने त्यांनी घटना स्थळावरून निघून गेले असल्याची माहिती तलावात कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी नातेवाईकांना सांगितले असे समजते . तेव्हां तिथे जमलेल्या जमावानी सदर घटनेची माहीती मुखेड पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक विलास गोबाडे , पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे , पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे , पोलिस नाईक गंगाधर चींचोरे , पोलिस अंमलदार किरण वाघमारे यांनी घटना स्थळी भेट देवुन शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हां तेथील मुलांना तलावाच्या बुडाला मृत्यू अवस्थेत चंद्रकांत याचा मृतदेह सापडला यादरम्यान मयत चंद्रकांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ . संतोष टाकसाळे यांनी शवविच्छेदन केले . या दुर्दर्वी घटनेची माहिती कुंटबांतील सदस्यांना कळताच त्यांनी एकच हबरडा फोडला सदर घटनेमुळे चोपवाड परिवारावर दुखाचा डोगंर कोसळला असुन फुलेनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . या घटनेची मुखेड पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . मयत चंद्रकांत याच्या पश्चचात आई , वडिल , तिन भाऊ असा परिवार आहे .

Previous articleपावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान।
Next articleबँकांकडून पीक कर्जवाटपात होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा.- शिवशंकर पाटील कलंबरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here