Home पुणे दापोडी मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले मंदिर परिसरातील गैरप्रकारांना बसणार आळा

दापोडी मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले मंदिर परिसरातील गैरप्रकारांना बसणार आळा

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0059.jpg

दापोडी मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले

मंदिर परिसरातील गैरप्रकारांना बसणार आळा

दापोडी,(प्रतिनिधी उमेश पाटील) : येथील संजय नाना काटे युवा मंचच्या वतीने हिंदू, मुस्लिम, इसाई आदी प्रार्थना स्थळांमध्ये ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यामुळे मंदिर परिसरातील गैरप्रकार सीसी कॅमेरामध्ये कैद होण्यास मदत होणार आहे.
मंदिर परिसर व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी विनंती केल्यानंतर प्रार्थना स्थळांमध्ये व प्रार्थना स्थळाच्या आवारामध्ये सध्यस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची खूप गरज असल्यामुळे संजय काटे यांना विनंती केली. त्यांनी त्याचा पाठपुरावा करून हिंदू, मुस्लिम, इसाई आदी प्रार्थना स्थळे व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, बालाजी झोनापल्ले, होली क्रॉस चे फादर अल्बर्ट फर्नांडिस, मदरसाचे मौलाना कारी साहब, मौलाना उमर काझी, मौलाना साद, इरफान शेख, अरुण शेख, मेहमूद भाई मुस्लिम बांधव तसेच मेथी डेसा, किशोर तुपे, लिओनन, थॉमस पारखे अमर खंडागळे जयसिंग काटे संतोष काटे रवींद्र बाईत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालीचरण पाटोळे तर आभार नंदु काची यांनी मानले.

फोटो : दापोडी येथील संजय नाना काटे युवा मंचच्या वतीने हिंदू, मुस्लिम, इसाई आदी प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

Previous article●करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न ●
Next articleअवैध गोवंश हत्या सात जणांवर गुन्हा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here