Home गडचिरोली कढोली येथे कॅन्सर ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत

कढोली येथे कॅन्सर ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत

22
0

आशाताई बच्छाव

IMG-20221205-WA0033.jpg

कढोली येथे कॅन्सर ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत
सावली /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) )
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता कढोली येथील सरपंच तथा काँग्रेस चे कार्यकर्ते किशोर कारडे यांनी कढोली येथील नागरिक नामे सयाजी श्रावन मारभते व मनोहर नामदेव मडावी या दोन व्यक्ती बाबत माहिती दिली होती त्यानुसार त्यांना माजी मंत्री तथा आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र विजय भाऊ वडेट्टीवार यांनी ततकाळ मदत पाठविली
अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या नामे सयाजी मारभते व मनोहर मडावी यांना मदत केल्यामुळे त्याच्या कुटूंबियांना आनंद झाला
सदर आर्थिक मदत गावचे सरपंच किशोर कारडे यांचे हस्ते देण्यात आली
यावेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे, अनिल मशाखेतरी, ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कुळमेथे, उपसरपंच सुमनबाई गेडाम, ग्रामपंचायत सदय प्रमोद कन्नाके, हरिदास भोयर मोतीराम कुळमेथे, मनोज कारडे, रजत कारडे,रोजगार सेवक आशिष कुळमेथे उपस्थित होते,
जनसेवा ही ईश्वर सेवा असते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा पुरुष असतो अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली
दरम्यान आजपर्यंत माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवर यांनी अनेक गरीब व्यक्ती ना मदत केली आहे त्याचीच प्रचिती आज कढोली येथे बघायला मिळाली जनसेवा ही ईश्वर सेवा हे ध्येय देऊन माजी मंत्री विजय वडेट्टीवार कार्य करीत असतात अशी भावना लोकांनी या प्रसंगी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here