Home गडचिरोली 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळावा तेली...

8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळावा तेली समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20221205-WA0032.jpg

8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळावा
तेली समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- 
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ, जिल्हा गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली, विदर्भ तैलिक महासंघ जिल्हा गडचिरोली, तेली समाज समिती सर्वोदय वार्ड , तेली समाज सेवा समिती हनुमान वार्ड गडचिरोली, संत जगनाडे महाराज बहुउदेशीय संस्था गडचिरोली, संताजी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली व तेली समाजाचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम व भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन ,संताजी स्मूती प्रतिष्ठान सर्वोदय वार्ड ,आरमोरी रोड गडचिरोली च्या सभागृहात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू मा डॉ श्री श्रीराम कावळे सर , जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री रोहिदास राऊत व प्रा. श्री शेषराव येलेकर , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, विदर्भ तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भांडेकर , संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा देवानंद कामडी, संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान ठाकरे, व तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन करण्यात आले 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी चौकात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून जयंती समारोहाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी 12 वाजता संताजी स्मूती प्रतिष्ठान च्या सभागृहात भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील तेली समाज बांधवांनी महिला व युवक- युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विविध तेली समाज संघटनेच्या वतीने करन्यात आले आहे.

Previous articleवारंवार बदनामी करणाऱ्याना १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस व पोलिसात तक्रार आमदार डॉ देवरावजी होळी यांचे पत्रकार परिषदेत उत्तर
Next articleकढोली येथे कॅन्सर ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here