Home Breaking News तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील घटना

तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील घटना

74
0

तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील घटना
नंदुरबार प्रतिनिधी :- गणेश (सागर)कांदळकर युवा मराठा न्यूज नेटवर्क
शेतकऱ्याचे नाव:- एकनाथ रामू पाटील
शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख-रांगोळी परी शिवार गट नं.7 शिवारातील तब्बल 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना देखील शॉर्टसर्किटमुळेच झाल्याचे समोर आले आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास लक्ष्मण पाटील हे शेतात असताना त्यांच्या समोर विजेच्या तारा तुटल्या आणि त्यातूनच आगेची निर्मिती झाली आणि वाढता वाढता काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं, गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोषक वातावरणामुळे वाढले क्षेत्र
शहादा तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि खरिपात सोयाबीन हेच मुख्य आहेत. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी सर्वात मोठे असलेल्या (cash crop) नगदी पिकाची लागवड केली होती. शिवाय निसर्गाच्या लहरीपणाचा केवळ ऊसावर परिणाम झाला नव्हता. आता तोडणी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे. अंतिम टप्प्यात ऊस असल्याने पाचरटही वाळले असल्याने ही आग पसरली यामध्ये एकनाथ रामू पाटील ह्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे प्रयत्नही व्यर्थ
परी शिवारात दुपारच्या प्रहरीच आग लागल्याने तो विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांनी मात्र, वाळलेले पाचरट आणि वाऱ्यामुळे ही आग पसरली. दरम्यानच्या काळात ग्रामस्थांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 2 वाजता लागलेली आग ही 3 च्या दरम्यान आटोक्यात आली. तोपर्यंत उभ्या ऊसाची राखरांगोळी झाली.

Previous articleमुर्दाड प्रशासन,निष्क्रिय अधिकारी;पत्रकाराचा लढा जीवनमरणाच्या दारात.! आणि आता अधिकाऱ्यांची पोहचणार मानव आयोगाच्या दारी वरात!
Next articleचातगांव वनपरिक्षेत्रांतर्गत राजगाटा (चक) येथे वाघाची दहशत,….  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here