Home Breaking News 🛑 मालगुंड येथील कवी केशव स्मारक परिसरातील स्वच्छता ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी’ तर्फे...

🛑 मालगुंड येथील कवी केशव स्मारक परिसरातील स्वच्छता ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी’ तर्फे करण्यात आली 🛑

307
0

🛑 मालगुंड येथील कवी केशव स्मारक परिसरातील स्वच्छता ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी’ तर्फे करण्यात आली 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मालगुंड/ रत्नागिरी :- येथील कवी केशव सूत स्मारक परिसरातील स्वच्छता प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री. सुनिल धावडे संस्थापित छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेकडून करण्यात आली.

कोरोनाच्या काळात ही या संस्थेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

अभियानाच्या सुरुवातीला कवी केशवसूत स्मारक समितीचे अध्यक्ष श्री.गजानन पाटील साहेब व कार्यवाह खेर मॅडम यांनी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे मुख्य सचिव श्री. समीर गोताड आणि प्रवक्ता श्री. संगम धावडे यांच्या पुढाकाराने आणि कवी केशव सूत स्मारकाचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील साहेब व कार्यवाह किर मॅडम यांच्या सहकार्याने अभियानास सुरुवात झाली. त्यामध्ये प्रतिष्ठान च्या सदस्यांनी स्मारकच्या परिसरातील गवत, पडलेली झाडें, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत, वेली यांची स्वच्छता केली. या मोहिमेसाठी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे श्री. सुरज पवार यांनी वस्तुरूपात मोलाचे सहकार्य केले. या अभियानात या संस्थेचे सदस्य प्रशांत कांबळे, संदेश धावडे, राहुल धावडे, विजय धावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ⭕

Previous article🛑 ” भारतीय मराठा संघ ” तर्फे कोकणातील अतिवृष्टी ग्रस्तांना मदतीचा हात 🛑
Next article🛑 ” झेप प्रतिष्ठानने ” दिला महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here