आशाताई बच्छाव
जिल्हा नियोजन समिती बैठक, जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे संपन्न….
मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हाच्या विकासासाठी कटिबद्ध…अधिकाऱ्यांना धरले धारेवर..मा.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार
नॅशनल हायवे रस्त्या संबंधि प्रश्न मार्गी लावा
.मा.खा.अशोकजी नेते
गोंदिया,/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):– गोंदिया जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे वनेमंत्री,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन आढावा बैठक घेऊन गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न केला जाईल,तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लाऊन, सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, छोट्या-मोठे व्यावसायिक औद्योगिक क्षेत्र यादृष्टीने सदर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आदी भागातील समस्या कश्या प्रकारे दुर करता येतील. याबाबत काही निर्णय सुद्धा घेण्यात आले
आरोग्य, सिंचन, कृषि, शिक्षण,रोजगार या विषयी विशेष लक्ष वेधलं
गोंदिया जिल्ह्याची जिल्हा नियोजन समिती बैठक आज दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोज सोमवार ला जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री,तथा राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, मंत्री मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.
मा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत नॅशनल हायवे रस्त्यासंबंधीची दुरावस्था व वनविभागाच्या येत असलेल्या अडचणी यासंदर्भात लक्ष वेधलं व शेतकरी,शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या बाबत प्रश्न मार्गी लावण्यासाठी,चांगले अभ्यासू ,विकास पुरुष, लोकनेते, लाभले,तसेच याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी वनमंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा नवनिर्वाचित पालकमंत्री मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन व स्वागत करुन वक्तव्य केलं.
जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू करण्यापूर्वी समाजवादी पार्टीचे संस्थापक,अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचे दुःखद निधन झाल्याने,गोंदिया जिल्ह्यातील असलेले भूमिपूजन रद्द करुन जिल्हा नियोजनाची सुरुवात करण्या अगोदर सभागृहामध्ये श्रद्धांजली वाहून नियोजनाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी वनेमंत्री,सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय मंत्री,तथा पालकमंत्री मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार,खासदार अशोकजी नेते गडचिरोली/ चिमुर लोकसभा क्षेत्र,खासदार सुनिलजी मेंढे, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार परिणय फुके,आमदार अभिजित वंजारी,आमदार विनोद अग्रवाल,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,आमदार विजय रहांगडाले,आमदार शहशराम कोरेटे,जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे,पोलीस अधिक्षक पानसरे,मुख्यकार्यकारी अधिकारी पाटील साहेब, तसेच अनेक पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते