Home गडचिरोली आमदार डॉ.देवरावजी होळी यांचा गाडिचा अपघात दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात घडला अपघात

आमदार डॉ.देवरावजी होळी यांचा गाडिचा अपघात दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात घडला अपघात

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20221005-WA0095.jpg

आमदार डॉ.देवरावजी होळी यांचा गाडिचा अपघात

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात घडला अपघात   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना अपघात झाल्याचं समजतेय. येथील गाढवी नदीच्या पुलावर ऐन मधोमध दुचाकीस्वाराला वाचविताना गाडी ट्रकला धडकली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याचं समोर आलं आहे. एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने आमदार डॉ. देवराव होळी आणि त्यांचे सहकारी सुखरूप वाचले. मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाल्याचं समजतेय. अद्याप दुचाकीस्वाराचे नाव व वास्तव्य कळू शकलेले नाही. अपघात होताच डॉ. देवराव होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्त युवकाला मदत पोहोचवली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल झाले. आरमोरी पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा अधिक तपास करत आहेत

Previous articleविचारांच सोन लुटूया!
Next articleआम्ही नांदगावकर आयोजित पर्यावरण पूरक घरगुती शाडूमाती गणपती व आरास स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here