आशाताई बच्छाव
जागतीक औषध निर्माण दिना निमित्त गोवंशाच्या आजारावर वसाली येथे समुपदेशन शिबीर संपन्न
युवा मराठा न्युज चॅनल प्रतिनिधी
रविंद्र शिरस्कार,संग्रामपुर
संग्रामपूर तालुक्यातील शेवटचे टोक वसाली या आदिवासी गावात दि २५ सप्टेबर रविवार रोजी जागतीक औषध निर्माण दिनाच्या पार्श्वभूमीवर लंम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारांबाबत संग्रामपूर तालुक्यातील केमिस्ट-अँड-ड्रगिष्ट असोसीयनच्या वतिने
भव्य समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले
ह्या शिबिरात शेकडो पशुधन धारकांनी आपली जनावरे आणुन त्या सर्वाना लसीकरण, आजाराची माहिती व मोफत औषधोउपचार करून घेतला .
तालुक्यातील आदिवासी बहुल गावात लंपी स्किन ह्या विषाणूजन्य आजारामुळे पशुधन धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली असल्याचे गांर्भिय लक्षात घेऊन केमिष्ठ अँन्ड ड्र गिंष्ट असोसियन ने मोफत औषध उपचार व समुपदेशन शिबिराचे आयोजन केले होते .
राष्ट्र नेता ते राष्ट्र पिता सेवा पंधरवाडा निमित्त आयोजीत ह्या शिबिराच्या अध्यक्ष स्थानी असलेले संग्रामपूर तहसिलदार यांनी आदिवासी बद्दलच्या जिवनमानात मोलाची आर्थिक बदल करणाऱ्या पशु धनाला लंपी स्कीन नावाच्या विषाणूजन्य आजारा पासुन संरक्षण कसे करावे ह्या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले तर शिबिरात गोधन पालकांना लंपी स्कीन आजारा पासुन त्यांचे गोधन कसे वाचविता येईल ह्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पशु वैध्यकिय अधिकारी डॉ. तडोकार यांनी केले . तसेच तहसिलदार वरणगावकर ह्यानी
त्यानंतर केमिष्ठ संघटनेचे संजय ढगे यांनी पशु पालकांच्या पाठीशी राहण्यास आमची संघटना सदैव तत्पर असल्याची उपस्तीतांना ग्वाही दिली .
वसाळी सारख्या शंभर टक्के आदिवासी असलेल्या गावात संपन्न झालेल्या हया शिबिराला तालुका केमिष्ठ अॅन्ड ड्रगिष्ठ असोशियनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
ह्या वेळी नायब तहसिलदार हरिभाऊ उकर्डे वसाळी ग्राम पंचायत च्या सरपंच मैनाताई पालकर , तलाठी भगत , वन विभागाचे सोळंके आदीसह ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील शेकडो पशु पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते .
शिबिराचे सुत्र संचालन केमिष्ठ गोपाल गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन केमिस्ट पांडूरंग इंगळे संग्रामपुर यांनी केले .