Home नाशिक शिक्षकदिनाच्या पुर्वसंध्येलाच शाळेतील साहित्य गेले चोरीला;मुख्याध्यापकावर अपहार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

शिक्षकदिनाच्या पुर्वसंध्येलाच शाळेतील साहित्य गेले चोरीला;मुख्याध्यापकावर अपहार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0067.jpg

देवळा प्रतिनिधी :– मेशी ता.देवळा येथील विधायक कार्य समिती नाशिक या जनता विद्यालय या शाळेत शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी शालेय साहित्यासह सी सी टिव्ही संच केला गायब.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मेशी येथे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची शाळा असून दहावी आणि बारावीची परीक्षा केंद्र देखील आहेत शाळेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने देखील केली आहेत अशातच आज चोरट्यांनी येथील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून सी सी टीव्ही संच चोरून नेला व शेजारील कार्यालयाचे देखील कुलूप तोडून तेथील तीन हजार नऊशे रुपयांचा सी सी टीव्ही स्क्रीन, सात हजार पाचशे रुपयांचा सी सी टिव्ही युनिट, तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा संगणक, चार हजार नऊशे एकोणपन्नास रुपयांचा सी पी यु,आठ हजार पाचशे रुपयांचा प्रिंटर असा एकूण तीस हजार सातशे नव्यानव रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून फिर्यादी दिलीप रणधीर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात अज्ञान चोरट्यांविरोधात भा. द.वि.कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळेचे कर्मचारी सकाळी साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना कार्यालयाचे कुलूप तोडलेले दिसले असता त्यांनी लगेच मुख्याध्यापक दिलीप रणधीर यांना भ्रमणध्वनी वरून घटनेची माहिती दिली त्यानंतर मुख्याध्यापकांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे पोलीस हवालदार पवार,शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान सदर शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात गावातील माजी सैनिक प्रवीण बोरसे व ग्रामस्थांनी अपहार केला असल्याचा आरोप केला असल्याने त्याबाबत चौकशीसमिती नेमण्यात आली असून त्या चौकशी समितीने शुक्रवारी शाळेला भेट देत सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौकशी केली आणि लगेच शनिवारी रात्री शाळेत चोरी होणे म्हणजे याबाबत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून ही चोरी नसून बनाव असल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे .याबाबत घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कचरे,पोलीस हवालदार पवार,शिंदे आदी करत आहेत.

Previous articleटाटा समूहाचे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
Next articleकळवणला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशीच्या जयंतीनिमित सर्वपक्षीय आदरांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here