Home नाशिक पिंगळवाडे येथे हर घर तिरंगा महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद.

पिंगळवाडे येथे हर घर तिरंगा महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0035.jpg

पिंगळवाडे येथे हर घर तिरंगा महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे

स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण होत आहे याचा आनंद व जल्लोष संपूर्ण भारत भर साजरा होत आहे. या उत्सवात संपूर्ण भारतीय सहभागी होत आहेत. याच अनुषंगाने पिंगळवाडे येथे ठिक ठिकाणी हा महोत्सव साजरा होतांना दिसत आहे. ग्रामपंचायत पिंगळवाडे यांच्याकडून ध्वज वितरण केले जात आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत मार्फत ध्वज सर्व नागरिकांना मोफत दिले आहेत. तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या मार्फत ध्वज वितरण केले जात आहेत. सोसायटी मार्फत हे ध्वज अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. संबंधित ग्रामपंचायत व सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार गावातील एकही कुटुंब हर घर तिरंगा या संकल्पने पासून वंचित राहणार नाही अशी आम्ही खबरदारी घेतली आहे. व त्याच पद्धतीने ध्वज खरेदी केले आहेत. विशेष बाब म्हणजे हर घर तिरंगा या महोत्सवास पिंगळवाडे वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. व नागरिक ध्वज घेत आहेत. व ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की ध्वजाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीने उभारावे असे ग्रामपंचायत सरपंच लताबाई भामरे यांनी नागरिकांना संबोधन केले. हर घर तिरंगा या महोत्सवास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांनी सुबक अशा पद्धतीने उभे राहून 75 व्या अमृत महोत्सवाचे प्रतीकात्मक दर्शन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व सर्वांगीण विकासात भर पडावी याच अनुषंगाने विद्यालयाच्या मार्फत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे त्यात निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व, गायन, नृत्य, रांगोळी, अशा अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या सर्व स्पर्धांचे नियोजन मुख्याध्यापक भोये सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच या स्पर्धांसाठी सर्वच शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आपली कठोर मेहनत देऊन विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here