Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज दिं.10 जून 2022...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज दिं.10 जून 2022 ला शासकीय विश्राम गृह गडचिरोली येथे युवा मोर्चाची बाईक रॅलीच्या च्या संदर्भात संघटनात्मक बैठकीचे आयोजन।

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220610-WA0038.jpg

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज दिं.10 जून 2022 ला शासकीय विश्राम गृह गडचिरोली येथे युवा मोर्चाची बाईक रॅलीच्या च्या संदर्भात संघटनात्मक बैठकीचे आयोजन।                                                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार बूयुरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

ही बैठक मान.खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वात तसेच मा.अमितजी गुंडावार युवा मोर्चा महा.प्रदेश उपाध्यक्ष,मा.अनिलजी डोंगरे युवा मोर्चा महा.प्रदेश सचिव प्रमुख भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.

या बैठकीमध्ये होणाऱ्या 14 , 15 ,16 जुन 2022 ला बाईक रॅलीच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवासदन, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजना आहेत.असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून खा.अशोकजी नेते यांनी केले.

या बैठकीत खा.अशोकजी नेते युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, माझं विद्यार्थी जीवनशैलीमध्ये सर्वप्रथम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक,युवा मोर्चा संघटना,सुशिक्षित बेरोजगार संघटना, इत्यादी या संघटनांचे नेतृत्व करून युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष पद भेटल, वृत्तपत्र संपादक म्हणून काम केलं. भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम काम केल.पक्ष वाढवला म्हणून पदाची गणीमा त्या व्यक्तीवर अवलंबून असते. पदापेक्षा काम व कार्य महत्त्वाचे असते असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते याप्रसंगी केले.

याप्रसंगी मा.अनिलजी डोंगरे, मा.अमीतजी गुंडावार, मा.चांगदेव फाये यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

त्याप्रसंगी मा.चांगदेवजी फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, मा.अमीतजी गुंडावार युवा मोर्चा महा. प्रदेश उपाध्यक्ष,मा.अनिलजी डोंगरे युवा मोर्चा महा.प्रदेश सचिव.मा. स्वप्नीलजी वरघंटे युवा मोर्चा प्रदेश सदस्य, मधुकर जी भांडेकर,मंगेश रणदिवे,आशिष कोडापे, स्वप्नील गेडाम,प्रतीक राठी, सुभाष अप्पलवार, उल्हास देशमुख पंकज खरवडे जितेद्र ठाकरे प्रशांत हटवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here