Home गडचिरोली गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषणा।

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषणा।

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220610-WA0030.jpg

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषणा।

गडचिरोलीत 14 तर देसाईगंजात 11 जागा महिलांसाठी राखीव

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): जिल्हातील गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी बुधवारला काढलेल्या अधिसुचनेनुसार दोन्ही नगर परिषद महिला राज राहाणार आहे.गडचिरोली नगर परिषदेची सदस्य संख्या 27 आहे.यातील 14 जागा महिलांसाठी राखीव राहाणार आहे.तर देसाईगंज नगर परिषदेची सदस्य संख्या 21 असुन 11 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी काढलेल्या अधिसुचनेनुसार 27 सदस्यीय गडचिरोली नगरपरिषदेमध्ये 2 जागा अनूसुचीत जातीच्या महिलांसाठी आरक्षीत राहातील. तर अनूसुचीत जमातीसाठी 2 व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 10 जागा आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. तर 21 सदस्यीय देसाईगंज नगर परिषदेमध्ये अनूसुचीत जाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षीत राहातील. तर अनूसुचीत जमातीसाठी महिलांनासाठी एकही जागा आरक्षीत नाही.व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 9 जागा आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. महिला उमेदवारांच्या आरक्षणाची घोषणा होताच नगर परिषदेच्या निवडणुकिसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here