आशाताई बच्छाव
कुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभात तुफान राडा … हाणामारी बुलढाणा,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात शिंदे गटातील काही शिवसैनिकांनी येऊन तुफान राडा केल्याची घटना घडली आहे…
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त जाहीर करण्यात आल्या, आणि या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम बुलढान्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात होताच शिंदे गटाचे काही शिवसैनिक अचानकपणे कार्यक्रमाच्या सभागृहात शिरले आणि कार्यक्रम उधळून खुर्च्यांची तोडफोड सुरू केली, यादरम्यान शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील लोटपाट करून मारहाण करण्यात आली…
जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चाललेल्या या राड्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनास्थळावरून काढता पाय घेतला..
त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील भेट दिली आहे, आणि राडा घालणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले,
एकंदरीतच आता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची वैचारिक मुद्द्यावरची लढाई आता गुद्द्यावर आली आहे…
युवा मराठा वेब नयुज, करिता संपर्क -रविंद्र शिरस्कार, संग्रामपूर