Home रत्नागिरी नळपाणी योजनेचे सुपरवायझर आनंदा मुळये ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त

नळपाणी योजनेचे सुपरवायझर आनंदा मुळये ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0013.jpg

नळपाणी योजनेचे सुपरवायझर आनंदा मुळये ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त                                 रत्नागिरी,(सुनील धावडे)

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे सुपरवायझर म्हणून अनेक वर्षे उत्तम कामगिरी बजावलेले आनंदा वसंत मुळ्ये हे आपल्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा जयगड नळपाणी पुरवठा योजनेतर्फे कळझोंडी धरण येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी आनंद मुळ्ये यांनी आपणाला आपल्यालाच गावात नोकरी मिळाल्याची जाणीव ठेवून मी माझ्या कामामध्ये प्रामाणिक राहून नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याचा मला आनंद असल्याची उस्फुर्त प्रतिक्रिया आनंद मुळ्ये यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. यावेळी श्री. सौ मुळ्ये यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली‌.

आनंद मुळ्ये यांच्या कामाचे कसब, कौशल्याबाबत अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. यामध्ये प्रभारी सुपरवाईझर सुरेश पवार, सहदेव वीर, पत्रकार किशोर पवार, विनायक शितप, रविंद्र जाधव, सुनिल दर्गवळी, प्रकाश भागुराम पवार, श्री.गावणकर,केशव शितप इ सहकारी कर्मचारी व मान्यवरांचा सामावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले.

Previous articleऔरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले!
Next articleरत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here