Home छ. संभाजीनगर औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले!

औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले!

218

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0015.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले! औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर सविता काळे या महिलेने पेटवून घेतले. त्यामध्ये ती ६०% भाजली असल्याने तिचा सरकारी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पाठीमागचे कारण सांगितले जाते की, तिच्या घराजवळील शेजारी दांपत्य तिला मानसिक त्रास देत होते व त्यांना वारंवार सांगूनही तो त्रास वाढत चालला होता. रोजच्या या त्रासाला ती कंटाळली होती. त्यामुळे तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली .ही तक्रार करूनही पोलीस दल दलाने सहकार्य केले नाही असे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे त्या महिलेने हे शेवटचे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस आयुक्तालया समोर स्वतःला पेटवून घेतले. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की सदर झालेली घटना लक्षात घेता तिच्या मृत्यू झाला जे कोणी जबाबदार असतील, त्यांची चौकशी केली जाईल. पुढील कारवाई त्यानुसार होईल असे यांनी सांगितले.

Previous articleश्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार आगमन!
Next articleनळपाणी योजनेचे सुपरवायझर आनंदा मुळये ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.