आशाताई बच्छाव
पिंगळवाडे परिसरात गणपती उत्सवात सुरुवात.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
साधारण दोन वर्ष कोरोना या महामारी मुळे गणपती उत्सवावर शासनाने निर्बंध आणले होते. तसेच गणेश भक्तांनी सुद्धा याबाबत शासनाच्या आदेशाचे पालन केले होते. परंतु यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यातच विशेष बाब म्हणजे पिंगळवाडे परिसरात बहुतांंशी नागरिक मळ्यात, वाडी, वस्त्यांवर किंवा शेतात वास्तव्यात असल्याने गणेश भक्तांनी ठिकठिकाणी वाडी वस्त्यांवर असताना सुधा गणपती स्थापना केली आहे. पिंगळवाडे गावात सुद्धा आदिवासी वस्तीवर गणपती स्थापना करण्यात आली आहे. तसेच टाकबारे शिवार, देवळी शिवार, खैरओहळ शिवार, विजयनगर शिवार, मुंगसे शिवार आदी शिवारात गणपती स्थापना करण्यात आली आहे. याबाबत तरुनांन मध्ये मोठा उत्साह दिसत आहे. टाकबारे शिवारात सलग दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात तरुण वर्गाची आनंदाचे वातावरण दिसत आहे.यात शुभम भामरे, विकास भामरे, निरंजन कापडणीस, कुणाल भामरे, विशाल भामरे, गौरव भामरे, राकेश भामरे,ओम साई भामरे,