आशाताई बच्छाव
सौ.बिनारानी देवरावजी होळी यांचे हस्ते नेताजी कप फुटबॉल प्रतियोगितेचे बक्षीस वितरण
नेताजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ सुभाषग्राम च्या वतीने १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत झालेल्या फुटबॉल कपच्या बक्षिस वितरनाचा दिमाखदार सोहळा संपन्न
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाषग्राम च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट ह्या दरम्यान झालेल्या फुटबाल कपचे बक्षीस वितरण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या धर्मपत्नी सौ.बिनारानी देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थाचालक बबलू हकीम,निखिल भारत बंगाली समन्वय समितीचे उपाध्यक्ष दीपक हलदार , बिधान ब्यापारी, बंगाली आघाडीचे जिल्हा महामंत्री सुशांतजी रॉय सरपंच कृष्णा मंडल, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा नेत्या सौ. अनिता रॉय , निरंजन बाछाड ,ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख यांचे सह नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाषग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते , व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
दिनांक १५ ऑगस्ट २२ ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. बंगाली भागातील परिसरामध्ये या प्रतियोगिते संदर्भात प्रचंड उत्सुकता असते. मागिल ५०हून अधिक वर्षांपासूनच ही प्रतियोगिता आयोजीत करण्यात येत असून दरवर्षी साजरा करण्यात येणारी क्रीडा स्पर्धा ही एक मोठी जत्राच असते.
यावेळी सौ. बिनारानी देवरावजी होळी यांचे हस्ते विजेत्यांना बक्षीस देवून त्यांचा गौरव करण्यात आला.