Home पुणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग आश्रमात साजरा.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0062.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग आश्रमात साजरा.

▪️पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पिंपरी चिंचवड, पुणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिन अजिंठा येथील अंध व अपंग आश्रमाला भेट देऊन साजरा केला. आश्रमाचे संस्थापक सुनील चोराडिया, सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोषाध्यक्ष राजेश शिंदे यांचा वाढदिवस आश्रमातील अंध व अपंग बांधवासोबत केक कापून साजरा केला.
यावेळी अंध व अपंग बांधवांनी देशभक्तीपर गीते गाऊन वातावरण निर्मिती केली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अंध अपंग बांधवांना अल्पोपहार देऊन त्यांच्यासोबत वार्तालाप करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहर उपाध्यक्षा उषा लोखंडे, सहसचिव निर्मला जोगदंड, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, सदस्य किशोर सुर्यवंशी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंध व अपंग आश्रम संचालक सुनिल चोरडिया यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र अंध अपंगांसाठी समाजातून तसेच स्वतःच्या घरातून केले जाणारे दुर्लक्ष याविषयीची खंत चोरडिया यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने अंध अपंगांच्या प्रवासासाठी बी आर टी ने अवलंबलेल्या नवीन मार्गामुळे अंध अपंग व वृद्ध यांना सरकारने डावलून त्यांचे नुकसान किंवा गैरसोय केल्याबद्दलची खंत चोरडिया यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध अपंग बांधवांसोबत साजरा केल्याने संघाचे कौतुक केले व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here