Home Breaking News *कौळाणेत राज्य कुणाचे?अफरातफर करणाऱ्याचे!अधिकाऱ्यांना किंमत उरलीच नाही का? विभागीय महसूल आयुक्तांचे अधिकाराचे...

*कौळाणेत राज्य कुणाचे?अफरातफर करणाऱ्याचे!अधिकाऱ्यांना किंमत उरलीच नाही का? विभागीय महसूल आयुक्तांचे अधिकाराचे काय?*

100
0

*कौळाणेत राज्य कुणाचे?अफरातफर करणाऱ्याचे!अधिकाऱ्यांना किंमत उरलीच नाही का? विभागीय महसूल आयुक्तांचे अधिकाराचे काय?*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निं) गांवी सध्या राज्य कुणाचे?तर या सरळसोप्या प्रश्नाचे उतर मात्र एवढेच आहे की,पदावर नसलेल्या परंतु सतेच्या मस्तीचे भूत अजूनही डोक्यातून न गेलेल्या तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव व तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे या अफरातफर करुन शासकीय दप्तरात फेरबदल करणाऱ्यांचे कौळाणेत सध्या तरी राज्य आहे.
बिनपगारी फुल अधिकारी याप्रमाणे पद नसताना देखील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लुडबूड करुन हस्तक्षेप करणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या अकलेचे दिवे पत्रकार भवन प्रकरणात चांगलेच पाजळले आहेत.त्ययामुळेच त्यांनी शासकीय अधिकार किंवा नियमांचा कुठलाही पुरेसा अभ्यास न करता पत्रकार भवनला दिलेली जागा असहमतीचे कारण दाखवत परस्पर नामंजूर करीत असल्याचे शासकीय दप्तरात लिहून ठेवले,मात्र शासकीय नियमाप्रमाणे सदरचा ठराव नामंजूर करण्याचा किंवा विखंडीत करण्याचा अधिकार हा विभागीय महसूल आयुक्तांचा असतांना कौळाणेत मात्र तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांने अक्षरशः धुमाकूळ घातला म्हणूनच सदरच्या शासकीय दप्तर प्रोसिंडिग पुस्तकात अजून काय काय अफरातफर या ग्रामसेवक सरपंचानी करुन ठेवली.याचाही आता शोध प्रशासनाने घेऊन सदरचे शासकीय प्रोसिडिंग पुस्तक जप्त करावे.आणि संबंधित कायद्याचे तीनतेरा वाजविणा-या गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शासन पातळीवरुन केले जावेत.
क्रमशः

Previous article🛑 असं आहे Big Boss 14 चे यावर्षीचे घर 🛑
Next articleमधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here