Home Breaking News 🛑 अनुपम खेर यांच्या आईसह चौघं करोना पॉझिटिव्ह 🛑 मुंबई ( साईप्रजित...

🛑 अनुपम खेर यांच्या आईसह चौघं करोना पॉझिटिव्ह 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

100
0

🛑 अनुपम खेर यांच्या आईसह चौघं करोना पॉझिटिव्ह 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन करोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता अनुपम खेर यांच्या आईसह भाऊ आणि कुटुंबातील चार लोकांना करोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी रविवारी सकाळी ट्वीट करून याची माहिती दिली.

अनुपम यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, काही दिवसांपासून त्यांची आई दुलारीची तब्येत बिघडली होती. तिला भूक लागत नव्हती आणि ती झोपूनच रहायची. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सुरुवातीला रक्ताची चाचणी घेण्यात आली. ज्यात सर्व काही ठीक दिसलं. नंतर सीटी स्कॅन केलं आणि त्यानंत करोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

अनुपम खेर यांच्या आईसह भाऊ, भावाची पत्नी आणि भाची करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. आईला तातडीने कोकिलाबेन इस्पितळात भरती केलं आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here