• Home
  • 🛑 नानावटी रुग्णालयातून बिग बी अमिताभ बच्चन यांची पहिला प्रतिक्रिया 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 नानावटी रुग्णालयातून बिग बी अमिताभ बच्चन यांची पहिला प्रतिक्रिया 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 नानावटी रुग्णालयातून बिग बी अमिताभ बच्चन यांची पहिला प्रतिक्रिया 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जुलै : ⭕ कोरोनाची लागण आता राजकीय नेत्यांनंतर बॉलिवूडमधील दिग्गचांनाही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोरोना पोहोचला आहे. बिग बींची प्रकृती शनिवारी रात्री बिघडल्यानं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची कोरोना चाचाणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘कोरोनाच्या महासंकटात डॉक्टर देवासारखं धावून आले आहेत. आज ते आहेत म्हणून कोरोना सारख्या महासंकटावर आपण मात करू शकतो. या संकटात सर्वात मोठा वाटा डॉक्टरांचा आहे’ नानावटी रुग्णालयातील अमिताब बच्चन यांचा जुना व्हिडीओ आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी Tweet करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.

या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment