Home बुलढाणा बेपत्ता असलेल्या उपोषणकर्त्याच्या पत्नीचा कुटुंबासह बीडी ओ च्या कक्षातच मुक्काम ! म्हणे...

बेपत्ता असलेल्या उपोषणकर्त्याच्या पत्नीचा कुटुंबासह बीडी ओ च्या कक्षातच मुक्काम ! म्हणे पती दाखवा.ग्रामस्थ आक्रमक.

155

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0090.jpg

बेपत्ता असलेल्या उपोषणकर्त्याच्या पत्नीचा कुटुंबासह बीडी ओ च्या कक्षातच मुक्काम ! म्हणे पती दाखवा.ग्रामस्थ आक्रमक.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर :- गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या संतोष गाळकर या उपोषणकर्त्यांच्या पत्नीने आज दुपारी संग्रामपूर पंचायत समिती मध्ये येऊन टाहो फोडत पतीचा शोध घ्या अशी मागणी केली, पण बी.डी.ओ. संजय पाटील हे नेहमीप्रमाणे आजही प.स.मधुन निघुन गेले. एक एक करता सर्व अधिकारी निघून गेले पंरतु शारदा संतोष गाळकर ह्या मात्र आपल्या २० वर्षाची कल्याणी व १७ वर्षाचा सुपेश नावाच्या मुलांसह न्याय मिळेपर्यंत रात्रीचा मुक्कामही प.स.मध्ये करणार असल्याने प.स.प्रशासनाची लाज चवाहाट्यावर आली आहे.
वरवट खंडेराव ग्रा.प.ने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व ग्रा.प.रेकार्डवर ८ अ दुरुस्तीची मागणी गेल्या आठ महिन्यांपासून.बेपत्ता असलेले उपोषणकर्ते संतोष गाळकर यांनी केली होती. पंरतु वेळो वेळी ग्रा.प.व प.स.अधीकाऱ्यांनी दिरंगाई करत न्याय न दिल्याने उपोषण कर्ताच अचानक गायब झाले असल्याने अखेर काल नेहमित पंचायत समितीत न दिसणाऱ्या गट विकास अधिकारी यांनी वरवट खंडेराव ग्रामपंचायतच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आलेल्या चौकशी अहवालावरून व इतरत्रही दोषी आढळल्याने ग्रामपंचायत वरवट खंडेराव येथील सचिव अविनाश यनकर यांना गटविकास अधिकारी संजय पाटील पंचायत समिती संग्रामपूर यांच्या आदेशाने दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी निलंबित करण्यात आले. तसेच उपोषणकर्ते उपोषण स्थळावरून गेल्या तीन दिवसापासून गायब असल्याने पोलिसांकडून शोध सुरू असून अद्यापही दिसून आले नसल्याने प.स.अधिकाऱ्यांवरच संशय निर्माण होत आहे. त्यामुळे जो पर्यंत माझ्या पतीला कोठे नेऊन ठेवले आहे हे सांगत नाही तो पर्यंत प. स. मधेच मुक्काम करणार असल्याचा निर्णय उपोषण कर्ते यांच्या पत्नीने घेतला आहे. त्यांच्या सह तालुक्यातील शेकडो नागरिक पंचायत समितीत उपस्थित आहेत. न्याय मागणाऱ्या महिलेची दखल न घेता सर्वच अधिकारी प.स.मधुन निघून गेले असल्याने त्यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार ..? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे केला जात आहे.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग आश्रमात साजरा.
Next articleभंडीशेगावजवळ पेट्रोल टँकर पलटी ,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.