Home नाशिक रात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ

रात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0011.jpg

रात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ

नांदगाव : प्रतिनिधी अनिल धामणे                   नांदगांव शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी ध्वजरोहण केल्यानंतर ध्वज संहिता पाळावी लागते. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा तर सूर्यास्तावेळी उतरवावा. अशा प्रकारची ध्वजसंहीता असतानाही नांदगावच्या तहसील कार्यलयात ध्वज रात्री साडेदहा नंतरही खाली उतरविलेला नसल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी हे घडले आहे. चार वेगवेगळ्या उपोषणांनी येथील तहसील विभागासह वीज वितरण विभागाची लक्तरेही टांगली गेलीत. हे कमी होते की काय म्हणून अजून एक प्रताप केला गेलाय ?, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.

खरंतर, हर घर तिरंगा यामाध्यमातून देशात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जावा. ज्यातून देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होईल असा उद्देश होता. यावेळी सामान्य नागरिकांना तिरंग्या विषयी काही सूट देण्यात आल्या होत्या. मात्र सरकारी कार्यलय, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज संहिता कायम होती. ज्या अनुषंगाने सूर्योदयाच्या वेळी ध्वजरोहन, तर सायंकाळी सुर्यास्ता वेळी ध्वज रीतसर खाली उतरवला गेला पाहिजे. मात्र नांदगाव तहसील कार्यालय प्रशासन इतकं निर्धास्त झालं की रात्री साडेनऊ वाजले तरी ध्वज खाली उतरणण्याचं भानच त्यांना राहील नाही. कदाचित येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी साजरी करण्याच्या व्यसत्तेमुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा विसर पडला असावा. अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी अशीही मागणी केली जात आहे.

Previous articleनांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,
Next articleदेशभरात विविध ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांनी एकोपा दाखवत ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here