Home बुलढाणा संग्रामपूर बिडिओ वर कारवाई न झाल्यामुळे कोद्री येथील नागरिकांची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय...

संग्रामपूर बिडिओ वर कारवाई न झाल्यामुळे कोद्री येथील नागरिकांची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय पुढे उपोषणाला सुरुवात!

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0101.jpg

संग्रामपूर बिडिओ वर कारवाई न झाल्यामुळे कोद्री येथील नागरिकांची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय पुढे उपोषणाला सुरुवात!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज)

बुलढाणा:- संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथील घरकुल योजनेत प्रपत्र (ड) यादीतील झालेला घोळ त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अपात्र दाखवून त्यांना घरकुलापासून वंचित ठेवणाऱ्यावर कार्यवाही करणे व इतर मागण्यांकरिता संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषणास बसावयास गेलेल्या नागरिकास माचीसची काळी लावून पेटवतो म्हणणाऱ्या गटविकास अधिकारी संजय पाटील तसेच व्हिडिओ व चार ग्रामसेवक यांनी केलेल्या ओल्या पार्टी प्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून निलंबन व इतर मागण्या बाबत दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे सात दिवसात कारवाई करण्याबाबत मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून लाक्षणिक उपोषण जिल्हा परिषद बुलढाणा येथे करण्यात येईल व त्यानंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कोद्री येथील श्रीराम पाटील खोंड यांनी दिला होता. त्यावर कुंभकर्णी झोपेतून संबंधित विभाग जागे न झाल्यामुळे व कुठलीही कारवाई न झाल्यामुळे अखेर ग्राम कोद्री येथील श्रीराम पाटील खोंड व निवृत्ती खोंड, भास्कर खोंड, मारुती साबळे, गजानन खोंड, नितीन शिंदे यानी आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्यदिनी सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण जिल्हा परिषद येथे केले. त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे व जिल्हा परिषद मधील तेथील कर्मचारी त्यांना दमदाटी करत असल्यामुळे एक तासाच्या लाक्षणिक उपोषण संपल्यानंतर उपोषण करते जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Previous articleचिकटगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here