Home संपादकीय त्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________

त्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________

77
0

आशाताई बच्छाव

FB_IMG_1654929119642.jpg

त्याग,बलिदान,समर्पण,वेळ
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________

वाचकहो, मानवी जीवनात जो तो स्वार्थासाठी अनेक खटपटी करताना दिसून येतो.केवळ स्वार्थासाठीच सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्याही घटना आपण बघतच असतो,एवढे स्वार्थीपण वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी करावे ही निश्चितच वैचारिकता नाही,आम्ही जन्माला आलो तेव्हा नंगे फकीर म्हणून आणि जाताना देखील जाणार आम्ही नंगे फकीरच.मग उठाठेव कुणासाठी?आणि कशासाठी?ज्यांना आम्ही रक्ताचे नाते समजतो म्हणजे आमचे मुलबाळ तेसुध्दा आमच्या उतारवयात त्यांचे रंग दाखवून मोकळे होतात.हा जगाचा इतिहास आम्हीच का नाकारायचा?जीवनात ज्यावेळेस कुठलेही संकट अथवा दुःख येते त्यावेळी आपल्या पाठीशी कुणाचा तरी भरभक्कम आधार असावा,असं प्रत्येकालाच वाटत.आणि स्वाभाविकच मग आपणही आपले काही नितीमुल्ये व समाजाचा हिस्सा समजून मानवतेच्या भावनेतून एखाद्याचा आधार बनलो,वेळ काळ कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त स्वतःच्या जीवनाचा त्याग करुन बलिदान देऊन आयुष्याची उमेदीची वर्ष एखाद्याचे भविष्य घडविण्यासाठी कधी स्वतः चा सुध्दा विचार न करता जीवनाची राखरांगोळी केली,निदान त्यांना तरी या गोष्टीचे महत्त्व व किंमत असते का?या गहन प्रश्नाचे उतर “नाही” असेच येते.मग संत कबीरदासजी महाराज म्हणतात ते काहीच वावगे नाही.”कवडी कवडी माया जोडी,संग ना आया अधेला चल उड जा हंस अकेला” किंवा “मोह मयी ना माया मयी,मर मर गया शरीर कहे गये दास कबीर” हे सगळ शाश्वत सत्य असतानाही आमचा मोह काही केल्या सुटत नाही.माया (संपत्ती ) आमच्या पोराबाळांसाठी कमावून ठेवण्याची लालसा देखील काही कमी होत नाही.पण…पुढे हिच आमची औलाद आम्हांला वाल्या कोळी समजणार नाहीत कशावरुन? निदान वाल्या कोळीचा वाल्मीक ऋषी तरी झाला.पण आम्ही आजही मोह माया प्रपंच या सगळ्या जंजाळात असे गुरफटत चाललो आहोत की,आम्ही आमची खरी ओळखच विसरु गेलो आहोत.आमच्यासाठी कुणी त्याग केला.कुणी बलिदान दिले.तर कुणी अक्षरशः आयुष्याची राखरांगोळी करुन घेतली याला महत्त्व व किंमत न देता,आम्ही फक्त आमच्या प्रपंचात व मुलाबाळात एवढे आंधळे झालोत की,आम्ही रामायणातील भरताच्या आईलाही मागे टाकले! एक मात्र खरं की,”ना माँ ना बाप ना भैय्या,सबसे बडा रुपय्या” आणि या रुपयानेच सगळ्यांना माझे माझे या उद्योगाला लावले.या स्वार्थीपणामुळे माणसाची किंमत अगदीच स्वस्त झाली आहे.आजकाल मुल आई बापाकडून फायदा बघतात.फायदा मतलब नसेल तर आई बापाला वाट्टेल त्या पध्दतीने बोलतात.मालेगांवसारख्या शहरातही असाच प्रकार आम्ही आँखो देखी बघितल्यावर जीवनाचे खरे मुल्य व मोल काय आहे हे समजले.”माणूस झाला सस्ता बकरा महाग झाला,पैसेने सबको खा डाला” माणसाची किंमत फक्त फायदा असेल तरच होते.मग ती आई असो,बाप असो,अथवा भाऊ असो,या पैश्याने सगळ्यांची मती भ्रष्ट करुन टाकली आहे.पैश्यांमुळे उभ्या उभ्या नात्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली आहे.तरीही आम्ही खरेपणाला न स्विकारता क्षणिक व भौतिक सुखाच्या मागे धावाधाव करीत आहोत.माणसाने वेळेला आपली सावली बनून आणि दुःख ,संकटात आधार बनून खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या माणूसकी या श्रीमंतीला महत्त्व द्यायचे कमी केल्याने,म्हणूनच कुणी कुणासाठी किती वेळ दिला,जीवनाचा काय त्याग करुन बलिदान देताना राखरांगोळी केली याला फारसे महत्त्व राहिलेले नाही.आणि जगात सगळं विकत घेता येऊ शकेलही पण…गेलेली वेळ कधीच परत कुठल्याही किंमतीत मिळू शकत नाही ही वास्तवता जो जीवनात स्विकारतो आणि सत्याच्या मार्गावर वाटचाल करतो तोच खरा दैवी शक्तीची जाणीव ठेवतो.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here