• Home
  • 🛑 मुंबईत ५ ऑगस्ट पासून…! सरसकट सर्व दुकानं उघडणार 🛑

🛑 मुंबईत ५ ऑगस्ट पासून…! सरसकट सर्व दुकानं उघडणार 🛑

🛑 मुंबईत ५ ऑगस्ट पासून…! सरसकट सर्व दुकानं उघडणार 🛑
✍️मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 ऑगस्ट :⭕ मुंबईत पाच ऑगस्टपासून सरसकट सर्व दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे. पुणे मनपाने शहरात एक दिवसाआड दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात मुंबईत औषधाच्या आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांनाच व्यवसाय करण्याची परवानगी होती. नंतर टप्प्याटप्प्याने दारू विक्रीची दुकानं, मोबाइल आणि रिचार्जची दुकानं, पंखे आणि एसी-कूलर विक्रीची दुकानं, हार्डवेअर दुकानं यांना परवानगी देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीशाळांना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता मुंबई मनपाने पाच ऑगस्टपासून सरसकट सर्व दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहे.

तब्बल पाच महिन्यांनंतर मुंबईत सरसकट सर्व दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कंटेनमेंट झोनमधील दुकानांसाठी बंधनं लागू राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये सरसकट सर्व दुकानांना परवानगी दिलेली नाही….⭕

anews Banner

Leave A Comment