Home Breaking News 🛑 अर्थमंत्र्यांनी पगाराबाबतचा नियम बदलला; सॅलरीवर होणार थेट परिणाम 🛑

🛑 अर्थमंत्र्यांनी पगाराबाबतचा नियम बदलला; सॅलरीवर होणार थेट परिणाम 🛑

96
0

🛑 अर्थमंत्र्यांनी पगाराबाबतचा नियम बदलला; सॅलरीवर होणार थेट परिणाम 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 ऑगस्ट : ⭕ देशभरात पसरणाऱ्या कोरोना संकटामध्ये केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. यानुसार प्रत्येक महिन्याला EPF चं कॉन्ट्रिब्युशन 24 टक्क्यांहून कमी केलं आहे. नव्या बदललेल्या नियमानुसार हा सहभाग 20 टक्के इतका असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, मे, जून आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांचं केवळ 10 टक्के पीएफ कापला आणि कंपनीकडूनही 10 टक्क्यांचा सहभाग राहिलं. मात्र आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सर्व कर्मचाऱ्यांना हातात मिळणारा पगार कमी होईल.

EPF स्कीमच्या नियमांनुसार कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून बेसिक वेतन आणि डीएचे 12 टक्के आपल्या ईपीएफ अकाऊंटमध्ये जमा होतात. यासह कंपनीलाही समान रुपात 12 टक्क्यांच योगदान करावे लागते. त्यामुळे एकूण मिळून कर्मचाऱ्याच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये 24 टक्के जमा होतात. या एकूण 24 टक्क्यातून कर्मचाऱ्याचा 12 टक्के हिस्सा आणि कंपनीचा 3.67 टक्के हिस्सा ईपीएफ अकाऊंटमध्ये जातो. तर बाकी शिल्लक कंपनीचा 8.33 टक्के हिस्सा एप्लॉयज पेंशन स्किम अकाऊंटमध्ये जातो.

EPF बँलेंस 4 पद्धतीने चेक केले जाऊ शकते, एपीएफओ अपच्या माध्यमातून Umang App, SMS च्या माध्यमातून वा Missed Call देऊन तुम्ही जमा रक्कम तपासू शकता. EPF मधील जमा रक्कम कशी तपासाल- EPFO App m-EPF डाऊनलोड करा. यात Member वर क्लिक करा आणि Balance or Passbook वर क्लिक करुन UAN नंबर, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकून जमा रक्कम चेक करा.⭕

Previous article🛑 डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीत स्फोट 🛑
Next article🛑 मुंबईत ५ ऑगस्ट पासून…! सरसकट सर्व दुकानं उघडणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here