• Home
  • 🛑 रत्नागिरीच्या छावा प्रतिष्ठान तर्फे ….! कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता 🛑

🛑 रत्नागिरीच्या छावा प्रतिष्ठान तर्फे ….! कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता 🛑

🛑 रत्नागिरीच्या छावा प्रतिष्ठान तर्फे ….! कवी केशवसुत स्मारकाची स्वच्छता 🛑
✍️रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था रत्नागिरी जिल्ह्यात गेली सहा वर्षे कार्यरत आहे. प्रतिष्ठान ची स्थापना दि.१४ /५ /२०१४ रोजी समाजातील गरजू आणि होतकरू लोकांसाठी मदत करणे,स्वच्छता मोहिमेसारखे कार्यक्रम राबवणे,आरोग्यविषयक शिबिरे घेणे,नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत करणे,शैक्षणिक बाबतीत होतकरू विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे.ई उद्धेश समोर ठेऊन झाली आहे.

सध्या सर्वत्र कोरोना महामारी असताना सुद्धा प्रतिष्ठान वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे.आपल्या महापुरुषांचा स्मारकरुपी ऐतिहासिक वारसा जतन करणे या भावनेतून आज दि.२/८/२०२० रोजी मालगुंड येथील ” कवी केशवसुत ” स्मारकाची स्वच्छता छावा प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली.

सुरुवातीला स्मारकाचे अध्यक्ष श्री.गजानन पाटीलसाहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वच्छता मोहिमेची करण्यात आली.

हि स्वच्छता मोहीम प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.सुनिल धावडे,उपाध्यक्ष श्री.सुनिल आग्रे,सचिव श्री.समीर धावडे,खजिनदार श्री.गणेश कांबळे, कार्यध्यक्ष श्री.संतोष आग्रे,प्रवक्ता श्री.संगम धावडे,मीडिया प्रमुख श्री.नितीन रोडे,सल्लागार श्री.मोहन पवार यांच्या नेतृत्वात पार पडली.

या स्वच्छता मोहिमेसाठी चंद्रकांत गोताड,मुकेश धावडे,केशव शिवगण,संदेश धावडे,सचिन धावडे,नंदकुमार धावडे,प्रशांत कांबळे, सुदीप पवार,विजय धावडे,राहुल धावडे,रितेश धावडे,हरिश्चंद्र गोताड,निलेश कलंबटे,समीर गोताड,मनोज मालप यांनी मेहनत घेतली….⭕

anews Banner

Leave A Comment