Home उतर महाराष्ट्र चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव, २१ वर्षांच्या मोक्षा ने घेतली...

चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव, २१ वर्षांच्या मोक्षा ने घेतली दीक्षा, महतीश्रीजी असे झाले नामकरण…..

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240212_073520.jpg

चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात जैन भागवती दीक्षा महोत्सव, २१ वर्षांच्या मोक्षा ने घेतली दीक्षा, महतीश्रीजी असे झाले नामकरण…..
श्रीरामपूर ,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील जैन समाजातील २१ वर्षांची
बीए सायकॉलॉजीचे शिक्षण घेतलेली मोक्षा प्रशांत चोपडा हीचा
जैन भागवती दीक्षा महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जैन संत साध्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोक्षा हिला साध्वीचा वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला. मोक्षा आता ‘प प पु महतीश्रीजी म सा ‘ या नावाने ओळखली जाणार आहे.
मोक्षा ही व्यापारी नेमीचंद माणकचंद चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत व सौ. प्रिती प्रशांत चोपडा यांची कन्या आहे. मोक्षा हिने तीन चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्नई बंगळुरू, बीड, जामखेड, छत्रपती संभाजीनगर असा सुमारे तीन हजार किलोमीटर प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे. जैनधर्मियात लहान वयापासूनच धार्मिक शिकवण दिली जाते. दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरू प्रतिभाकंवरजी यांचा पहिल्यांदा सहवास लाभला. तेव्हापासूनच दीक्षा घेण्याचे विचार मोक्षा करत होती. जैन भागवती दीक्षा महोत्सवा निमित्त जैन स्थानकात १ ते ११ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोक्षा चोपडा हि नवकार आराधिका प्रतिभाकंवरजी व आयंबिल तप आराधिका जिनशासन प्रभावीका प्रफुल्लाजी आदि साध्वी मंडळच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषि यांच्या अरविंदाने दीक्षापाठ अंगीकारुन जैन साध्वी झाली.दिक्षा महोत्सवासाठी मैनसाधक सौरभमुनि, युवा प्रणेते गौरवमुनि, शालिभद्र, प्रणवमुनि, सार्थकमुनि व सक्षममुनिजी आदि संत महात्म्याच्या समवेत नवकार आराधिका प्रतिभा, आयंबिल आराधिका प्रफुल्ला आदीसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र चेन्नई बेंगलोर आधी राज्यातील हजारो जैन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
४० वर्षापूर्वी सुमिता (कोपरगांव) व सुनेता (केडगांव, पुणे) यांची दीक्षा श्रीरामपूर येथे झाली होती. आता श्रीरामपूरची कन्या मोक्षा चोपडा हिची जैन भागवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. तसेच अंजली ही माजलगाव येथे २८ एप्रिल रोजी दीक्षा घेणार आहे

Previous articleभाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारूचा साठा पकडला; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Next articleआजचा विद्यार्थी भरकटतोय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here