Home रत्नागिरी कशेळीत वाघाचा धुमाकूळ; गायीवर केला हल्ला

कशेळीत वाघाचा धुमाकूळ; गायीवर केला हल्ला

127

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0012.jpg

कशेळीत वाघाचा धुमाकूळ; गायीवर केला हल्ला         रत्नागिरी,(सुनील धावडे)

राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील श्री. राजन आगवेकर यांच्या गायीवर दि.२ संप्टेबर रोजी दु. ३ वा.सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले आहे. सड्यावर चरायला सोडलेल्या गायीवर हल्ला चढवला यामध्ये गाय मृत्यूमुखी पडली.

याआधीही असे वाघाचे हल्ले झाले आहेत. तर पुन्हा एकदा कशेळी गावात वाघाचा धुमाकूळ दिसून येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी देखील सावध व सजग रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.