Home बीड भाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारूचा साठा पकडला; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

भाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारूचा साठा पकडला; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240212_073229.jpg

भाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारूचा साठा पकडला; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:११  भाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका पांढऱ्या एक्टिवा स्कुटीवर दारूचा बॉक्स पोत्यामध्ये लपवुन विक्रीसाठी आणणार होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गणेश येडे वय 30 वर्षे रा. चौसाळा यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याने सुरुवातीला पोत्यात भाजीपाला असल्याचे सांगितले. मात्र झाडाझुडतीनंतर यात देशी विदेशी दारू चा मोठा साठा आढळून आला. दरम्यान या कारवाईत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाईत शिक्षक नंदकुमार ठाकूर, आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, स पो नि बाबासाहेब राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, सुशील पवार, सय्यद अशपाक, मनोज परजपे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here