Home बीड आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20240212_072828.jpg

आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/गेवराई दि:११  मराठा समाजाला मुंबईत आरक्षणाची घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे. तोच आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे घडली. गेवराई तालुक्यातील नागझरी येथील हनुमान शिवाजी शिंदे वय २७ वर्षे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने हनुमानने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. हनुमान शिंदे यांनी आयटीआय केला होता, मात्र तो बेरोजगार होता. आरक्षण मिळाल्यास रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा त्याला होती. हनुमान शिंदे हा आरक्षणाच्या आंदोलनात सातत्याने सहभागी असायचा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेलेल्या आरक्षण रॅलीत शिंदे याने सहभाग नोंदवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल अशी अपेक्षा होती. मात्र आरक्षणाची घोषणा होऊनही अंमलबजावणीला उशीर होत असल्याने हनुमान शिंदे यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे कुटुंबीयाची परिस्थिती हालाखीची आहे. शिंदे यांच्या पश्चात आई बहीण असे कुटुंब आहे. या घटनेत गेवराई आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
Next articleभाजीपाल्याच्या पोत्यातून देशी विदेशी दारूचा साठा पकडला; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here