Home बुलढाणा स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवातील तिरंग्याच्या खरेदीचा भ्रष्टाचाराचा आरोप

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवातील तिरंग्याच्या खरेदीचा भ्रष्टाचाराचा आरोप

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0052.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवातील तिरंग्याच्या खरेदीचा भ्रष्टाचाराचा आरोप

युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार ,संग्रामपूर

तालुका संग्रामपुर येथील अधीक्षकांनी तिरंगा झेंडा खरेदीत भष्ट्राचार केल्याचा आरोप करून नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली आहे.

कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या रकमेचे झेंडे न आणता त्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी नगर पंचायतीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. संग्रामपूर शहरात
नगरपंचायती कडून झेंडे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने कुणीही झेंडे विकत आणून आपल्या घरावर लावले नाहीत. त्यामुळे नगरसेवक चांगलेच संतप्त व आक्रमक झाले

याबाबत प्रभारी मुख्याधिकारी सुर्वे यांना माहिती विचारणा केली असता याबाबतीत त्याना कुठलिही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून दुपारी त्यांनी कार्यालयाला भेट दिली असता न.प.गट नेता आणि मुख्याधिकारी यांच्यामध्ये या गोधळमुळे चांगलीच बोलचाल झाली झाल्याचे सांगण्यात आले आहे.

येथील नगर पंचायतच्या सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी त्यांना मिळणारा भत्ता नगर पंचायतला देऊन २८ हजार रकमेतून तिरंगा झेंडा खरेदी करण्याबाबत ठराव घेऊन अधीक्षकांना तिरंगा झेंडा खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली.

नगर पंचायतच्या अधीक्षकांनी नगर पंचायतला १५०० झेंडे उपलब्ध करुन दिल्या नंतर ठरल्या प्रमाणे संत गुलाब बाबा विद्यालयास ३०० झेंडे, जि. प. उर्दू शाळा व खाजगी उर्दूशाळा दोन्ही शाळांना १५० झेंडे, जिल्हा परिषद विद्यालय २०० झेंडे मराठी प्रा. शाळा १०० झेंडे, कन्या शाळा १०० झेंडे नगरसेवकांना २५० झेंडे, पोलिस स्टेशन ५० झेंडे, नगर पंचायत कडून वितरण करण्यात आले तर ३७ नागरिकांना झेंडे विक्री करण्यात आले. त्यानंतरही ५० झेंडे निकृष्ट पडून आहेत व १५० झेंडे नागरिकांनासाठी उपलब्ध आहेत. असे अधीक्षकांच्या दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here