Home गडचिरोली हिंदू संस्कृतीचे उत्तम दर्शन घडविणारा सण तान्हा पोळा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

हिंदू संस्कृतीचे उत्तम दर्शन घडविणारा सण तान्हा पोळा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0050.jpg

हिंदू संस्कृतीचे उत्तम दर्शन घडविणारा सण तान्हा पोळा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नगरपंचायत चामोर्शी पदाधिकारी ,नगरसेवक, नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ताना पोळा नंदीबैल सजावट व साजेशी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण

ताना पोळ्याच्या माध्यमातून लहान मुले विविध धार्मिक वेशभूषा परिधान करून नंदीबैलाची सजावट करून एकत्रित येतात यातून आपल्या हिंदू संस्कृतीचे उत्तम असे दर्शन घडते असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील भव्य ताना पोळ्याच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी केले.
नगरपंचायत चामोर्शी पदाधिकारी ,नगरसेवक, नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ताना पोळा नंदीबैल सजावट व साजेशी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

यावेळी चामोर्शी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. जयश्रीताई वायलवार, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, चामोर्शीचे पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब, केवळराम हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य बनपूरकर सर ,नगरसेविका प्रेरणाताई आइंचवार नगरसेविका गेडामताई , नगरसेविका सातपुते ताई, चामोर्शीचे पोलीस उपनिरीक्षक साठे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, पोळा हा बैलांचा सण . बैलांच्या माध्यमातून शेतीची कामे वर्षभर केली जातात. त्या बैलांच्या मेहनतीने वर्षभर पोट भरणारा शेतकरी पोळ्याच्या निमित्याने आपल्या बैलांची पुजा करतो. त्याच प्रकारे दुसऱ्या दिवशी नंदी बैलाच्या प्रतिकृतीची पूजा करून तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान मुल लाकडाने बनवलेला नंदीबैल त्याला उत्तम सजावट करून स्वतः विविध वेशभूषा करून एका ठिकाणी एकत्र येऊन तान्हा पोळा साजरा करतात. कोणी शेतकऱ्याचे ,कोणी जटाधारी शिवशंकराचे ,तर कोणी भगवान श्री कृष्णाची वेशभूषा करून हर बोला हर हर महादेव अशा गजरामध्ये घोषणा देवून आपल्या हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवितात.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Previous articleमहाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
Next articleवाशिममध्ये भाजपा पदाधिका-यांच्या कामाबाबत समाधान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here