Home पश्चिम महाराष्ट्र धक्कादायक ; जहाजातू न आलेले डिझेल विकण्यासाठी जमिनीत पुरले दोन टँकर बेकायदा...

धक्कादायक ; जहाजातू न आलेले डिझेल विकण्यासाठी जमिनीत पुरले दोन टँकर बेकायदा डिझेल विक्री उघडकीस : टेंभूर्णीजवळ शेतात छापा , दोघांना अटक

118
0

राजेंद्र पाटील राऊत

धक्कादायक ; जहाजातू न आलेले डिझेल विकण्यासाठी जमिनीत पुरले दोन टँकर बेकायदा डिझेल विक्री उघडकीस : टेंभूर्णीजवळ शेतात छापा , दोघांना अटक
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर / टेंभूर्णी : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील ‘ एमआयडीसी ‘ मधील मालट्रक अचानक शेताकडे धावू लागल्या . हा काय प्रकार आहे जाणून घेतला असता आतमध्ये बोगस डिझेल पंप सापडला . पोलिसांना पाहून शेतातून पळून जाणाऱ्या ‘ कोल्हे ‘ ला पकडले . या पंपावर ११ रुपये कमी दराने डिझेल मिळत असल्याचे निदर्शनास आले . या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . ही डिझेल विक्री उघडकीस येऊ नये , यासाठी दोन टँकर जमीनीत पुरल्याचे निदर्शनास आले .
श्रीकृष्ण ऊर्फ दादा विजय कोल्हे ( वय ( ३४ ) , रमेश विजय कोल्हे ( दोघे रा . कोल्हे वस्ती , टेभुणी ) , शंकर राजाराम किर्ते ( वय ४५ रा . बेंबळे ता . माढा ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत . यातील रमेश कोल्हे हा फरार झाला आहे . टेंभुर्णी येथे एमआयडीसी पासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये बेकायदा डिझेल विक्री सुरू होती . शासकीय दराने मिळणाऱ्या ८६ रुपये प्रति लिटर पेक्षा ११ रुपये कमी भावात ७५ रुपयाला डिझेल मिळत होते . कमी भावात डिझेल मिळत असल्याने एमआयडीसीमध्ये आलेले मालट्रक थेट शेताच्या दिशेने धावू लागले . हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सर्रासपणे सुरू होता . कोल्हे वस्तीवर बेकायदा डिझेलची विक्री होत असल्याची
माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली . पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तेथे धाड टाकली . तेव्हा तेथे ट्रॅक्टरच्या टँकरमधून मालट्रकमध्ये डिझेल भरले जात होते . पोलिसांनी श्रीकृष्ण ऊर्फ दादा कोल्हे व कामगार शंकर किर्ते या दोघांना ताब्यात घेतले . तर रमेश कोल्हे हा शेतातून पळून गेला . याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा १ ९ ५५ कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे , सहाय्यक फौजदार
याप्रकरणामुणा पालास पाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा १ ९ ५५ कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे , सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर , नीलकंठ जाधवर , पोलीस अमलदार नारायण गोलेकर , धनाजी गाडी , अक्षय दळवी , चालक समीर शेख , माढा तहसील येथील पुरवठा अधिकारी यांनी पार पडली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here