Home बुलढाणा स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निघाली ७५किलोमीटर पदयात्रा

स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निघाली ७५किलोमीटर पदयात्रा

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0047.jpg

स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निघाली ७५किलोमीटर पदयात्रा

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी रवि शिरस्कार संग्रामपूर

जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस नेते डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात ७५अमृत मोहत्सवाची पदयात्रा दिनांक १२ ऑगस्ट रोजी शेगाव वरून जळगाव कडे निघाली आहे

या पदयात्रेमध्ये ७५ किलोमीटरचे पदयात्रेचे ध्येय समोर ठेवण्यात आले असून ही पदयात्रा प्रत्येक मतदारसंघातून निघनार आहे त्यामुळे जळगाव जामोद मतदार संघातून सुद्धा स्वातीताई वाकेकर यांचे नेतृत्वात पदयात्रा दि. १२ऑगस्ट रोजी निघाली असून शेगाव वरून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रा १२ ऑगेस्ट रोजी वानखेड गाव पुर्ण करून या पदयात्रेची स्नेहभोजनसह मुक्काम व्यवस्था केली होती.

दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वानखेड येथून पदयात्रेचे प्रस्थान झाले असुन वरवट बकाल येथे आल्यानंतर चौकामध्ये सोनाळा येथील सरपंच यांनी काही आदिवासी महिला पुरुष यांचें बराच वेळ आदिवासी नृत्य सादरीकरण केले.या आदिवासी नृत्य बघन्या करिता असंख्य लोकांची गर्दी झाली होती यावेळी काँग्रेस नेते स्वातीताई वाकेकर यांनी आदिवासी नृत्य प्रमुख यांचे पुष्पहार अर्पण करून नृत्य सादरीकरण करून पदयात्रेची शोभा वाढविल्यामुळे आपल्या करकर्त्यांसह स्वागत केले. त्यांच्याप्रमाणे स्वातीताई वाकेकर यांनी सुद्धा आदिवासीं नृत्याच्या ठेक्यावर नृत्य सादर केले. त्याचप्रमाने स्वतीताईंना प्रतिसाद देण्याकरिता वरवट बकाल सरपंच प्रतिभा इंगळे तसेच गावातील काही सदस्य महिलां यांनी सुद्धा आदिवासी महिला सोबत नृत्य सादर केले.

पदयात्रेतील शेकडो कार्यकरत्यांच्या *भारत माता की जय*, *वीर जवान अमर रहे* , *जय जवान जय किसान*,*स्वातीताई तुम आगे बढो ह्म्म तुम्हारे साथ है* या नाऱ्यांनी वरवट बकाल नगरी दुमदुमुन गेली होती. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो व असे नारे देत सदर पदयात्रेने वरवट बकाल गावाला वेढा घातला काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा या पदयात्रेमध्ये सहभाग होता.

विशेष म्हणजे यामध्ये आदिवासी बांधवांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता. तदनंतर वरवट बकाल गाव पूर्ण करून पदयात्रा कला व वाणिज्य वरवट बकाल येथे पदयात्रेतील कार्यकर्त्यांना स्नेहभोजन,विश्रांती करिता गेलेली असुन करून ही पदयात्रा पुढें जळगाव कडे रवाना होणार असल्याचे आयोजकांच्या माहिती सूत्राने समजले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here