आशाताई बच्छाव
जिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
जिंतूर तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्टला सकाळी १०. ३० वाजता जिंतूर येथील न्यायालय परिसरात या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीत सर्व प्रकारची तडजोड पत्रे, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलन, चलनक्षम दस्तावेज अधिनियम, वीजचोरी प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे, घरपट्टी, बँकांचे वसुली वाद पूर्व प्रकरणे आदी प्रकारची दिवाणी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. त्यात तडजोडीअंती अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. आर. पनाड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. ए. सोनवणे, उपाध्यक्ष अॅड. एम. डी. जोशी, सचिव अॅड. एम. व्ही. , दाभाडे यांनी केले आहे.